अनेक मुलांनी आपल्या वेषभूषेने लोकांचे वेधले लक्ष्य
श्री अमोल निनावे
संपाद्क :-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
लोणवाही – येथील बुद्धिविधता गणेश मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘तान्हा पोळा’ मोठ्या उत्साहात साजरा केला. मंडळाचे संयोजक आणि नगरसेवक पंकज नन्नेवार यांच्या पुढाकाराने आयोजित या सोहळ्याला बालकांचा आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वर्षी बालकांसाठी विशेष स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात नंदी सजावट, सुदृढ बालक आणि वेशभूषा स्पर्धा यांचा समावेश होता.
दुपारी ३ वाजता सुरू झालेल्या या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. निरीक्षण करणाऱ्या चमूने प्रत्येक स्पर्धेचे बारकाईने निरीक्षण करून गुण दिले. या बालकांनी विविध सामाजिक संदेश देणाऱ्या वेशभूषा साकारून सर्वांचे लक्ष वेधले.
या स्पर्धेत ‘कांतारा’ चित्रपटातील भूमिकेची वेशभूषा साकारलेली कायरा सुनील गेडाम विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. तिच्या अप्रतिम वेशभूषेमुळे अनेकांनी तिच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. निरीक्षण चमूपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनीच तिच्या या वेशभूषेचे कौतुक केले.
स्पर्धेतील विजेत्या बालकांना बक्षीस आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या कायराला वन परिक्षेत्र अधिकारी प्रादे सिंदेवाही अंजली बोरावार (सायंकार),यांच्या हस्ते सीमा सहारे, नंदा नरसाळे, लता गेडाम ,दिलीप दुस्सावार, सुनिल उईके, मधुकर जल्लावार गणेश गोलपल्लीवार,मोहुर्ले सर, श्यामकुवार सर,रवी सावकुडे , सुनील जनबंधू, गोपी लोंढे, चिंटू कटारे व इतर मान्य
वरच्या उपस्थिती मधे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कायराच्या या यशामागे मृणाली, अनुष्का आणि अंशुल महेंद्र गेडाम यांची मेहनत आहे, ज्यांनी ही वेशभूषा साकारण्यासाठी अथक प्रयत्न केले.


