श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
चंद्रपूर :-24 तास सतत कामाच्या टेंशन मध्ये असलेल्या पोलीस बांधवाना आपल्या जीवनात एन्जॉय करायला वेळ मिळत नाही. तर ते केवळ आपली ड्युटी कस जनतेची सुरक्षा करता येणार याकडे लक्ष्य ठेवून काम करीत असतात.
पोलीस कर्मचारी हे आपली ड्युटी करत असताना कुटुंब आणि जीवनातील आनंद याकडे वेळेच्या अभावी दुर्लक्ष करून जीवन जगत असतात.
अश्या वेळेस त्यांना लाभलेले अधिकारी सुद्धा त्यांना ड्युटी च्या वेळेस त्रास देऊन हरॅसमेंट करीत असतात त्यामुळे त्यांना आणखी त्रास होतो. प्रत्येक सण समारंभामधे पोलीस हेच एकमेव कवच म्हणून लोकांना सुरक्षा प्रधान करण्याचे काम करीत असतात. अश्यातच त्यांना सुद्धा जीवनात आनंदी राहावे व आपण सुद्धा सर्वसामान्य लोकांसारखे जीवन जगून आनंदात सहभागी व्हावे असे वाटत असते पण तसे त्यांना त्या दिवशी प्रत्यक्षात भाग घेता येत नाही.
म्हणूनच खूप वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्याला लाभलेले एकमेव दबंग तसेच सर्वकर्मचारी यांना आनंदी, खेळीमेळीच्या वातावरणात काम करवून घेणारे चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री निशिकांत रामटेके साहेब हे दरवर्षी पोलीस स्टेशनला गणपतीची स्थापना करून सर्व कर्मचारी सोबत नित्यनियमाप्रमाणे पूजा अर्चना करून तसेच रोज वेळात वेळ काढून कर्मचारी सोबत नवीन नवीन उपक्रम राबवून आठही दिवस एन्जॉय करित असतात आणि शेवटच्या दिवशी समस्त कर्मचारी लोकांसोबत मनमुराद आनंद घेत गणपती बापाचे विसर्जन करित असतात.
त्यामुळे समस्त पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे कितीही जीवनात ड्युटीला त्रासलेले असतील तरीपण या कृती मुळे त्यांचे मन आणखी प्रलभीत होतात आणि नवीन चेतनने काम करण्यास सज्ज होतात.
म्हणून ज्या पोलीस स्टेशनला श्री निशिकांत रामटेके यांची बद्दलि केली जाते तिथल्या कर्मचारी हा खुशीच्या लहरींमध्ये तल्लीन होऊन जात असतो. आणि त्यांच्या मुखात सत्य शेवटी एकच वाक्य असतो “रामटेके साहेबांसारखे पुन्हा अधिकारी भेटणार नाही “. सर्व सामान्य कर्मचारी लोकांना आपलें म्हणून काम करवून घेणारे, त्यांना प्रेमाची भाषेचा ज्ञान देणारे, कामात कामचुकारी नं करता योग्य रीतीने कसे काम करायचे हे शिकविणारे व सर्व सामान्य जनतेला वाद नं घालता जीवनात कसे खुशीत जगायचे असे मार्गदर्शन करणारे व समाजात असणाऱ्या गोरगरीब लोकांना आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासणारे अश्या सर्व गोष्टीने परिपूर्ण असणारे श्री निशिकांत रामटेके साहेब हे शहर पोलीस स्टेशनला लाभलेले आहे. त्यात चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक श्री मुमक्का सुदर्शन साहेब यांनी मोलाची साथ देऊन सर्व शहर पोलीस बांधवाना आनंदी ठेवण्यास मदत केली आहे.


