श्री अमोल निनावे
संपाद्क :-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही :- बुद्धिविधाता गणेश मंडळ लोणवाही सिंदेवाही आणि शालिनीताई मेघे हॉस्पिटल सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने मा.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात दिनांक 5 सप्टेंबर रोज शुक्रवार ला सकाळी 10 ते दुपारी 1वाजेपर्यंत निःशुल्क महाआरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिराचे आयोजन बुद्धिविधाता गणेश मंडळाच्या प्रांगणात करण्यात आले होते. या मध्ये विविध प्रकारच्या 748 रुग्णांनी आपली तपासणी करून घेतली त्यापैकी 277 रुग्ण हे पुढील उपचारासाठी पात्र ठरले आहेत,
या कार्यक्रमाचे उद्घाटन खा नामदेवराव किरसान यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष ता कांग्रेस चे अध्यक्ष रमाकांत लोधे हे उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती प स विरुभाऊ जैस्वाल म ता अध्यक्ष सीमाताई सहारे माजी नगराध्यक्ष स्वप्नील कावळे, सचिन नाडमवार संजयभाऊ पुपरेड्डीवार न प च्या उपाध्यक्ष पुजाताई रामटेके नगरसेविका निताताई रणदिवे मीनाक्षी मेश्राम, मीनाक्षी बन्सोड, म्याडम मंगेश मेश्राम, विनोद सहारे सर, संदीप भरडकर सर महेश मंडलवार, घडसे सर, बनकर सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते
बुद्धिविधाता गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षीच तान्हा पोळा आरोग्य तपासणी शिबीर तसेच विविध समाजपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते त्यानुसार यावर्षी निःशुल्क महाआरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात 748 नागरिकांनी सहभाग नोंदविला त्या सर्व नागरिकांची तज्ज्ञ डॉक्टरांच्या हस्ते तपासणी करण्यात आली त्यामधून 277 रुग्णांना पुढील उपचारासाठी शालिनीताई मेघे हॉस्पिटल व रिसर्च सेंटर सावंगी मेघे येथे लवकरच पाठविण्यात येणार असून हा सर्व खर्च मोफत असणार असल्याचे मंडळाचे सर्वेसर्वा नगरसेवक तथा माजी पाणीपुरवठा सभापती नगर पंचायत सिंदेवाही लोणवाही चे पंकज भाऊ नन्नेवार यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री डोंगरवार सर यांनी तर संचालन सुनील उईके सर व आभार रंजित निकुरे यांनी मानले हे शिबीर यशस्वी होण्यासाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे


