सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या टीमचे तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने मानले आभार
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही :- दर वर्षी गणपतीचे आगमन मोठ्या थाटात सिंदेवाही तालुक्यात होत असते मात्र सर्वात जास्त गणपती हे मस्कऱ्या बसत असते. आणि सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव व सिंदेवाही हे दोन ठिकाण चंद्रपूर जिल्ह्यात मस्कऱ्या गणपती साठी फेमस म्हणून ओडखल्या जाते.
अश्यातच शांतता अभावीत राहावी व कोणतेही वाद विवाद नं होता स्थापना व विसर्जन शांततापूर्ण व्हावे अशी अपेक्षा समस्त नागरिकांकडून तसेच प्रशाशनाकडून होत असते.
त्यामुळे काही महिन्या अगोदरच पदभार स्वीकारले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कांचन पांडे यांच्या समोर सिंदेवाही आणि नवरगावचे मस्कऱ्या गणपतीचे विसर्जन हे आव्हान होते असे म्हणाला काही हरकत नाही. मात्र त्यांच्या प्रदीर्घ ड्युटी चा अनुभव आणि त्यांच्या कामाची कौशलता हे त्यांच्या कामी आली असे म्हणाला हरकत नाही.
गणपती च्या आगमना अगोदरच शांतता समितीचे बैठक घेणे, समस्त गणपती मंडळ च्या पदाधिकारी यांची बैठक आयोजित करणे व शांतता पूर्वक कसे आपल्याला विसर्जन करता येईल यावर सतत मार्गदर्शन केल्या मुळे काल झालेल्या विसर्जनाला कोणतेही गालबोट नं लागता शांततेत विसर्जन पार पडले. त्यामुळे सिंदेवाही पोलीस स्टेशनचे समस्त सिंदेवाही वाशीय जनतेनी आभार मानले.


