पोलीस पाटील आणि लोकांनी पकडली दारू.
नवरगाव येथील देशी दारूच्या दुकानातून होते अवैध वाहतूक
सिंदेवाही पोलीस याकडे लक्ष्य देऊन माल वाहतूक होणाऱ्या दुकानावरती कार्रवाही करणार का?
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
नवरगाव :-दि. 5/9/2025 रोजी मौजा देलनवाडी येथील पोलीस पाटील तसेच फिरोज पठाण यांनी फोन द्वारे सिंदेवाही पोलीस स्टेशनला गुप्त माहिती दिली की, मौजा देलनवाडी येथील शाळेजवळ दोन इसमांना देशी दारूची वाहतूक करीत असताना गावातील लोकांनी पकडून ठेवले आहे. या खबरे वरून घटनास्थळी सफौ. देशमुख पो. अ. निलावार चा. पो. हवा. दुपारे यांनी पोहोचून उपस्थित दोन पंचा समक्ष लोकांनी पकडून ठेवलेल्या दोन इसमा जवळील प्लास्टिक पोत्याची पाहणी केली असता त्यामध्ये तीन फाटलेल्या खर्ड्याचे खोक्यात 250 नग देशी दारू, राकेश संत्रा कंपनीच्या प्रत्येकी 90 एम एल नि भरलेल्या.असा माल अवैद्यरीत्या बिना परवाना मिळून आल्याने सदरची देशी दारू अंदाजी किंमत 8,750/रु. व आरोपीतानी गुन्ह्यात वापरलेली मो.सा. क्रमांक एम एच 34 सीबी 7283 किंमत 40,000 रु. असा एकूण 48,750 रु. चा माल आरोपीसह ताब्यात घेऊन पंचनामा कारवाई केली. सिंदेवाही पोलीस स्टेशनला आरोपी नामे मोसा चालक (1)राहुल अरुण गेडाम वय 22 वर्षे (2)जगदीश देवदास शेंडे वय 40 दोन्ही रा. नवरगाव दोन्ही आरोपी विरुद्ध अप. क्रमांक 334/25 कलम 65 (अ), 83 मदाका अन्वये नोंद करण्यात आली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास माननीय पोलीस निरीक्षक कांचन पांडे. यांचे मार्गदर्शनात नवरगाव पोलीस चौकीचे पो. ह. वा. संदीप कोवे हे करीत आहेत.


