श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271317
सिंदेवाही :-चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाहीत “जश्ने ईद-ए-मिलाद” मोठ्या उत्साहात आणि पूर्ण शांततेच्या वातावरणात साजरा करण्यात आले
ईद-ए-मिलाद, म्हणजेच पैगंबर मुहम्मद (स.अ.व.) यांचा जन्मदिन, मुस्लिम बांधव श्रद्धेने आणि प्रेमाने साजरा करतात.
जगभरात हे पर्व प्रार्थना, दान, ऐक्य आणि मानवी प्रेमाचा संदेश देणारा उत्सव म्हणून मानला जातो.
सिंदेवाही शहरात या पर्वाचे औचित्य साधून प्रमुख चौक, रस्ते आणि धार्मिक स्थळं तिंरगा झेंडयासह हिरव्या झेंड्यांनी, बल्ब लाइटिंगच्या प्रकाशांनी आणि फुलांच्या सजावटीने सजवण्यात आली होती.
जुलूसाची सुरुवात जामा मस्जिदपासून झाली. गांधी चौक, गुरुदेव चौक, सिद्धार्थ चौक, पोलिस स्टेशन मार्गे, लोनवाही, मदनापुर वार्ड, आज़ाद चौक आणि एकता चौक असा संपूर्ण मार्ग निश्चित करून मिरवणुकीचं आयोजन करण्यात आले.
५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता सुरुवात झालेली ही मिरवणूक दुपारी १२ वाजता शांततेत संपन्न झाली.
या मिरवणुकीत सर्व वयोगटातील मुस्लिम समाज बांधव, महिला, तरुण आणि लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
“नारा-ए-तकबीर, अल्लाहू अकबर” च्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमलं.
मिरवणुकीदरम्यान नात-शरीफ, सलाम याचं पठणही करण्यात आलं.
जागो जागी शरबत, लंगर चा आयोजन करण्यात आला।
तीन ते चार तास चाललेल्या या मिरवणुकीत एकही अप्रिय घटना नोंदली गेली नाही.
स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था काटेकोर ठेवली होती.
नागरिकांनीही संयमाने सहभाग घेत शांतता आणि एकतेचा संदेश दिला.
चंद्रपूर–सिंदेवाहीमध्ये झालेलं हे आयोजन केवळ धार्मिक पर्व न ठरता, सांस्कृतिक आणि समाजबंध वृद्धिंगत करणारा उत्सव ठरला आहे. गांधी चौक येथे या मिरवणूकिचा फुलांनी स्वागत करण्यात आला
एकता, शांतता आणि मानवी प्रेमाचा संदेश देत जश्ने ईद-ए-मिलाद उत्साहात पार पडले.


