लाखो, करोडो रुपयांच्या गाड्यात ऑक्सिजन सिलेंडर गायब
श्री अमोल निनावे
संपाद्क :-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
मा. ना. श्री विजय वड्डेट्टीवार, पालकमंत्री चंद्रपूर यांच्या संकल्पनेतून जिल्हा खनिज प्रतिष्ठान चंद्रपूर यांच्या निधीतून चंद्रपूर जिल्ह्याला 2020-21 मध्ये चार चाकी मोठी रुंगवाहिका देण्यात आल्या होत्या. मात्र या रुग्णवाहिका मध्ये महत्त्वाचे जे रुग्णाला लागणारे साहित्य सामुग्री असायला पाहिजे तेच या वाहिकेत नसल्याने त्या वाहिकेचा उपयोग तात्काळ मध्ये रुग्ण असलेल्या रुग्णाला न्यायला पडत नसल्याने लोकांमध्ये नाराजीचे सूर वाहू लागले आहे.
वास्तविक बघता लाखो करोडो रुपयाच्या रुग्णवाहिका लोकांच्या सोयीसुविधा साठी प्रत्येक तालुक्याला सरकारी रुग्णालयाला मिळाल्या होत्या त्यामुळे सर्व लोकांना असे वाटले कि आता आपल्याला मोफत मध्ये ऍम्ब्युलन्स मिळतो आणि तुरंत सेवा मिळतो त्यामुळे रुग्ण लोक खुश होते मात्र जेव्हा त्या गाड्या मध्ये oxygen सिलेंडर नसल्याने त्या गाडीचा कोणताही उपयोग रुग्णांना होताना दिसत नाही.
तात्काळ एखाद्या रुग्णाला सिंदेवाही मधून चंद्रपूरला न्यायचे असल्यास त्यांना गाडीत प्राणवायू सिलेंडर गॅसची किट या गाडीत उपलब्ध नसल्याने खाजगी गाडी करून पैसे मोजून न्यावे लागत असल्यामुळे लोकांना अनेक प्रश्न मनात निर्माण होताना दिसत आहे. लाखो रुपयांचे गाड्या देऊन काय उपयोग असा प्रश्न आता लोक करित आहेत. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष्य देऊन तात्काल रुग्णवाहिकेमध्ये गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी समस्त चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांकडून होत आहे.


