श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही:- विघ्नहर्ता बाल गणेश मंडळ जुनी लोणवाही हे खूप वर्षांपासून गणपतीची स्थापना करित असून अनेक नवीन नवीन उपक्रम राबवित असतात.
अश्यातच यावर्षी नावीन्य उपक्रम म्हणून जे लोणवाही मध्ये जाणाऱ्या येणाऱ्या रस्त्यावरती अनेक खड्डे पडलेले होते अश्या रस्त्यांवरती मुरूम व बारीक गिठीची चुरी टाकून बुजविले.
जे काम नगरपंचायतचे होते ते काम गणपतीच्या मंडळांनी केले. रस्त्यातील खड्डे बुजविल्यामुळे गणपती मंडळाचे लोनवाही वाशीय जनतेनी कौतुक केले असून त्यांचे आभार मानले.या उपक्रमला गणपतीचे अध्यक्ष कु. प्रणय पेंदोरकर, सचिव हर्षद बोरकर,सदस्य संदीप नन्नावरे, प्रतिक नन्नावरे, सचिन kudhmethe,श्लोक कुभरे,साहिल वैरकार, गौरव कोलते,दक्ष बोरकर,लोचन नन्नावरे, गिरीश नागापुरे,अश्विन नन्नावरे उपस्थित होते.


