श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही येथील समस्त पुरुष व महिला समाजबांधवांनी ढाणकी (यवतमाळ) येथील पद्मशाली समाजाच्या अल्पवयीन मुलीवर ट्युशन क्लासेसच्या शिक्षकाने अमानुषपणे लैंगिक अत्याचार केला होता आणि त्यात त्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. त्या नराधम शिक्षकास कठोरात कठोर शिक्षा होवून फाशी द्यावी. करीता सिंदेवाही तहसीलदार तर्फे मा. मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य आणि चंद्रपूर जिल्ह्याधिकारी यांना घडलेल्या घटनेची समाजबांधवांनी तीव्र शब्दात निषेध करून प्रौढ अध्यक्ष श्री संजय कुंटावार, महिला अध्यक्ष सौ. संध्याताई बल्लेवार आणि नगरातील जेष्ठ नागरिक बहुसंख्य पुरुष आणि महिला यांच्या उपस्थितीत तहसीलदार साहेब आणि ठाणेदार साहेब यांना निवेदन दिले.


