वनविभागाने त्वरित लक्ष्य देऊन बंदोबस्त करावे अशी लोणवाही वाशीय जनतेची मागणी
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही लोणावही या ठिकाणी अनेक महिन्यापासून बिबट्या आणि पट्टेदार वाघ यांनी भर दिवसा धुमाकूळ घालणे सुरु केले असून. अनेक लोकांचे घरचे शेळ्या बकऱ्या तसेच बैल ठार केले आहेत.
आज दिनांक 26/9/2025 रोजी शुक्रवारला किशोर बोरकर यांच्या घरासमोरून सायंकाळला 6. 30 वाजता भला मोठा पट्टेदार वाघ गेल्याने प्रत्यक्षरित्या किशोर बोरकर यांच्या फॅमिलीने बघितल्याने त्यांची फॅमिली भयभीत झालेले आहे.
सायंकाळ असल्याने सर्व फॅमिली मधील लोक घराच्या बाहेर पोर्च मध्ये बसले होते अचानक मोठा पट्टेदार वाघ त्यांच्या अगदी जवळून गेल्याने त्यांचे थोडक्यात प्राण वाचले असे म्हणाला काही हरकत नाही.
त्यांनी हि माहिती लगेच वनविभागाला दिली त्यामुळे फटाके फोडून त्या वाघाला रेल्वे स्टेशनच्या मार्गाकडे पाठविण्यात आले. मात्र एक दिवस नक्कीच गडबोरी मध्ये जस मुलाला घेऊन गेला तसेच इथे पण होणार हे नाकारता येणार नाही त्यामुळे त्वरित वनविभागाने बंदोबस्त करावे अशी मागणी लोणवाही ग्रामस्थांनी केली आहे.


