श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही :चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील एक महिन्याअगोदर सर्वाच्या चर्चेत असलेला नंदू खोब्रागडे चा मर्डरप्लॅन हा विषय चांगलाच गाजलेला होता. त्यात तीन आरोपी यांना अटक कऱण्यात सिंदेवाही पोलिसांना यश आले होते मात्र एक आरोपी फरार झालेला होता.
140 (3) 103 ,61 (2) भारतीय न्यायसंहिता मधील फरार आरोपी नामे कुणाल विलास प्रचाके वय 23 वर्ष राहणार मुरादपूर, तालुका समुद्रपूर, जिल्हा वर्धा यास सिंदेवाही पोलिसांनी अटक केली . सदर आरोपीस माननीय कोर्टात हजर केले असून त्यांची रवानगी कारागृहात कऱण्यात आली.


