तालुक्यात रेती तस्करी जोमात महसूल विभाग कोमात
रस्ते, नाल्या बांधकाम करणारे ठेकेदार स्वतःचे jcb, ट्रॅक्टर लावून करीत आहे रेती साठवून ठेवण्याचे काम.
श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही :: सध्या सिंदेवाही तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत असतांना दिसत आहे, आणि रेती तस्कर ना हे सुगीचे दिवस महसूल विभाग मुळे आले असे म्हणणे अजिबात अपवाद चुकीचे ठरणार नाही, रेती ची तस्करी करणे म्हणजे प्रशासकीय यंत्रणा च्या मदतीशिवाय रेती ची तस्करी करणे म्हणजे येड्या गबाळ्या सारखं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणं होय, कारण रेती दहा वेळा जरी चोरी करत असले तरी एकदा सापडणे आहेच, आणि मग एकदा वाहन सापडलं तर दंड भरल्याशिवाय पर्याय नसतो, शासनाचा दंड लाखो च्या जवळपास भरावा लागतो त्या मुळे रेती तस्कर पण
आगीत हाथ टाकण्यापेक्ष आगीत थोडं पाणी(सेटलमेंट च ) टाकून आजमावून पाहतात, पर्यायी मार्ग मिळालं कि मग ( सेटलमेंट च )
थोडं थोडं पाणी टाकत आग हळू हळू शांत महसूल विभागाला शांत करण्याचा प्रयत्न होतो, रेती तस्करी करण्याचे
कार्य सिद्ध करतात, रेती तस्कर कडून मिळत असलेल्या
आर्थिक पाहुणचार मुळे प्रशासकीय यंत्रणा नतमस्तक होऊन होऊन खुलेआम रेती तस्करी करण्याची सूट देतात, असं आमच्या गोपनीय सूत्र कडून माहिती मिळाली आहे, आणि नागरिकांच्या चर्चेत सुद्धा हा विषय आहे, मग
रेती तस्करी बाबत एक दोन बातम्या आल्या कि मग चिमूटभर कारवाही होते, मग दाखविल्या जाते कि आम्ही किती कर्तव्य चे पालन करीत रात्री बेरात्री रेती तस्करी करणारे वाहन पकडले याचा गवगवा मोठ्या प्रमाणात केला जातो, नदीतील रेती तस्कर च्या रेती उपस्या मुळे पाण्याची पातळी खोलात जात आहे, उन्हाळा ची चाहूल लागतात तालुक्यातील काही गावाना पिण्याच्या पाण्या साठी वन वन भटकंती करावी लागते, ही सत्यता आहे, आपल्या गावाला लागून असलेल्या रेती उपस्या बाबत आजू बाजूच्या गावातील नागरिक होत असलेल्या रेती तस्करी वर तोंडाला कुलूप लावून बसले आहेत, त्या मुळे रेती तस्कर ना गावकऱ्याचा कुठलाच अळथळा देत नसल्याने रेती तस्कर च सुद्धा चांगल निभत आहे, अवैध रेती उपशा मुळे पाण्याची पातळी आणखी खोलात जाऊन गावालाच पाण्याची टंचाई निर्माण होते पण गावातील नागरिकांना हे अजूनही कळलं नाही, याच दुर्दैव म्हणावं लागले, शासना कडून नागरिकांना घरकुल मिळाले आहे तुंज्या पुज्या मानधनात आपले घर बनविण्याचे स्वप्न बघतो, घराला लागणारी रेती ही नाईलाजास्तव तस्कर कडून चढ्या भावाने खरेदी करावी लागते, हे सत्यता आहे, एकीकडे घरकुला साठी रेती मिळत नाही आणि दुसरी कडे रेती तस्कर मोठ्या ठेकेदार ना कामाच्या ठिकाणी रेती पुरवत आहेत.
पण महसूल विभाग मधील यंत्रनेला या बाबत काही घेणं देण नाही आज आपलं भागत दुसरा उपाशी मेला तरी चालेल अशी नीती महसूल विभाग सिंदेवाही ची आहे त्या मुळे रेती तस्करा रात्री बेरात्री रेती उपसा करण्यासाठी खुलेआम सूट आहे.


