चंद्रपूर जिल्ह्यात अजूनही सुरु आहे नायलान मांज्या विक्री.
पोलीस अधिक्षक यांनी कार्रवाहीचा बडगा उचले असताना सुद्धा तरीपण नायलानचि विक्री होते कशी?
जखमीला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल.थोडक्यात जीव वाचला.
श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो.नं. 9764271316
चिमूर तालुक्यातील नावाजलेल्या नेरी या ठिकाणी झालेली घटना. मकरसंक्रांत असल्याने शालेय बालके हे पंतग उडवून उत्सव साजरा करतात मात्र हाच उत्सव जेव्हा जीवघेणा ठरतो आणि पतंगाचा मांजा गळा कापतो तेव्हा मात्र खूप दुःखद घटना घडते. अशीच घटनाआज नेरी येथील कन्या शाळेजवळ घडली असून दुचाकीने जात असताना रस्त्यावर आलेल्या पतंगाच्या मांजाने इसमाचा गळा चिरला व ते गाडी घेऊन पळले तेव्हा त्यांची मान तर कापलीच मात्र हातापायाला इजा सुद्धा झाली. मात्र सदर प्रकार लक्षात येताच तात्काळ हाताने मांजा पकडल्याने थोडक्यात बचावले.
नेरी येथील रोशन लांजेकर युवा व्यवसायिक हे काही कामानिमित्त कन्या शाळे जवळून दुचाकीने जात असताना अचानक पंतगचा मांजा गळ्यासमोर आल्याने गळा चिरला गेला दुचाकी अगदी संथ गतीने असल्याने त्यांनी तात्काळ मांजा हातात पकडला त्यामुळे पुढील अनर्थ टळला असून गळा आणि हात चिरून दुखापत झाली आहे नेरी येथील डॉ वाघे यांच्याकडे प्राथमिक उपचार करून पुढील उपचार चिमूर येथील रुग्णालयात सुरू केले असता त्यांना जवळपास गळ्याला 9 टाके लागलेले आहे. सदर प्रकरणी अज्ञात पतंग उडवणाऱ्या वर कारवाई करावी तसेच नेरी येथील तीन दुकांनात मांजा असल्याची माहिती समोर आली आहे तेव्हा पोलिसांनी सदर विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे
वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष्य देऊन संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याभर दुकानदार तसेच नायलान मांज्याने पतंग उडविण्याऱ्यावरती कार्रवाहीचा बडगा उचलतील का?याकडे सर्वांचे लक्ष्य लागलेले आहे. तसेच लांजेकर यांना नुकशान भरपाई द्यावी अशी परिवारांची मागणी होत आहे.