अखेरीस बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला आले यश
श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या धुमनखेडा या गावात अनेक दिवसापासून हिंस्त्र प्रांण्यांचे वावर आढळून येत होते. या दोन महिन्या अगोदरच एक भली मोठी अस्वल “प्राथमिक आरोग्य केंद्रच्या” गेट मधून स्थलांतरण करून शेतशिवारात शिरली होती.
अश्यातच आज भर दिवसा शेताच्या बांध्या मधून एक बिबट्या गावात शिरला आणि दोन महिला आणि एक मुलगी तसेच एक पुरुष व एक अधिकारी यांना घायल करून आपला बस्तान एका घरच्या कोठ्या मध्ये मांडून बसला होता. त्यामुळे शेकडो लोकांची बघण्याची भूमिका धुमनखेडा इथे झाली होती.
कोणतीही अनहोनी घटना घडू नये सुवेवस्था अबाधित राहावी या करिता सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री विजय राठोड साहेब तथा तळोधी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तसेच वनविभागचे वनाधिकारी श्री सालकर साहेब हें आपल्या चमूसह उपस्थित होऊन त्या बिबट्याला जेरबंद केले.
परंतु समोर असेच प्राणी गावात शिरून धुमाकूळ घालून नासधूस किंवा जीवाला हानी पोहचवतील अशी भीती आता धुमनखेडा मधील लोकांना झाली असल्याने त्या गावात असलेल्या हिंस्त्र प्राण्याचा बंदोबस्त करावे अशी मागणी गावातील लोकांकडून होत आहे.
जखमी झालेल्या लोकांना तात्काळ चंद्रपूरला भरती केले असून त्यांच्यावरती उपचार सुरु आहे.


