श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही, सिंदेवाही मधील वार्ड क्र. 2 मध्ये असलेल्या जिल्ह्या परिषद शाळेमध्ये आज दुपारच्या जेवण्याच्या खिचडी मध्ये विषबाधा झाली असे प्राथमिक अंदाजा वरून लक्षात आलेले असून. एकूण सहा विध्यर्थी हे मडमड तसेच उलटी आणि चक्कर येऊन शाळेत पडले त्यामुळे लगेच त्यांना जवळच्या शासकीय प्राथमिक रुग्णालयात नेण्यात आले.
प्राथमिक रुग्णलयात नेले असता डॉक्टरनी लगेच तपासणी करून सलाईन तसेच आवश्यक औषधी उपचार वेळेत केल्याने त्या मुलामुलींचे प्राण वाचले
या अगोदर आदल्या दिवशी पण एका मुलाला जेवणातून विषबाधा झाली अशी माहिती पालकांकडून मिळाली आहे. हेच प्रकार जर सतत होत राहणार तर एक दिवस नक्कीच मोठी दुर्घटना घडणार हे निच्चीत. त्यामुळे याकडे वरिष्ठ अधिकारी तसेच जागृत पालकांनी आवर्जून लक्ष्य देण्याची गरज आहे. मात्र एवढा मोठा प्रकार घडून सुद्धा कोणतेही वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात येऊन त्या मुलांची भेट घेऊन विचारपूस किंवा चौकशी करू शकले नाही त्यामुळे या वरून असे लक्षात येते कि सिंदेवाहि मधील जिल्ह्या परिषद शाळा हि रामभरोसे असून केवळ शाळा चालविणे म्हणजे चालविणे यावर कोणत्याही सरकारी यंत्रणेचा दबाव किंवा लक्ष्य नाही हे स्पस्ट दिसून आलेले आहे.
पालकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत असून आपल्या पाल्याना शाळेत पाठवायचे कि नाही अशी धास्ती मनात त्यांच्या निर्माण झालेली आहे.
सरकारनी मुलांना शाळेची आवड निर्माण व्हावी तसेच बालक सुधृढ व्हावे याकरिता शिक्षण प्रणाली मध्ये बद्दल करुनं शाळेतच पौस्टिक आहार देण्याचा नियम तयार केलेला आहे. मात्र शाळेतील शिक्षक तसेच मदतनीस असणारे स्वयंपाकी महिला ह्या खिचडी बनविताना कोणत्याही वस्तूची शहानिशा नं करता स्वयंपाक बनवीत असल्याने आज मुलांना विषबाधा तर झाली नसेल नं असे प्रश्न आता पालकांच्या मनात पडू लागले आहे. त्यामुळे सिंदेवाही मधील वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे आवर्जून लक्ष्य द्यावे अन्यथा शाळेला ताला ठोकू असे काही पालकांनी म्हटले आहे.
त्या शाळेतील मुख्याध्यपिका रामटेके मॅडम यांच्या सोबत बोले असता त्यांनी दिलेली माहितीत कोणतेही प्रश्नाचे उत्तर अचूक मिळालेले नाही.नेमका हा प्रकार हा कशामुळे घडलेला आहे. आणि याला सर्वशी जिम्मेदार कोण आहे हे समोरील चौकशीत लवकरच उघडकीस येणार. त्या मुलांची प्रकृती सध्या ठीक असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.


