श्री अमोल से निनावे
संपाद्क :झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
ब्रम्हपुरी -महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी निर्माण केलेली शिवसेना बाळासाहेब शिंदे गटामध्ये सिंदेवाही तालुक्यातील छोट्याशा गावातील रत्नापूर येथील युवक यांच्या अनेक वर्षाच्या कामाचा तपशील पाहून निवडणुकीच्या तोंडावरती सर्वात मोठ्या पदी नियुक्ती कऱण्यात आली आहे. रत्नापूर मधील शेतकऱ्यांसाठी सतत झटत असलेले आणि तालुका प्रमुख असताना अनेक युवकांना एकत्र करून गोरगरीब लोकांचे काम करणारे श्री नेताजी गहाणे यांची नियुक्ती ब्रह्मपुरी विधानसभा प्रमुख पदी केली आहे. त्यांचा अनुभवाचा आणि तसेच लोकांसोबत असलेल्या संपर्काचा अनुभव नक्कीच शिंदे गटाला होणार अशी आशा शिंदे गटानी ठेवली आहे. मा किशोर रॉय संपर्क प्रमुख यांच्या आदेशानुसार मा किरण भाऊ पांडव यांच्या निवासस्थानी बंडूभाऊ हजारे जिल्हा प्रमुख चंद्रपूर यांच्या उपस्थितीत नेताजी प्रकाश गहाणे यांची ब्रम्हपुरी विधानसभा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.त्या वेळी ब्रम्हपुरी तालुका प्रमुख नरेंद्र नरड,सिंदेवाही तालुका प्रमुख जालिंदर गायकवाड, सावली तालुका प्रमुख उमेश गोल्लेपालिवार यांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या


