- जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत प्रवित्र प्रणालीतून नियुक्ती झालेल्या शिक्षकांपैकी गर्भवती, अपंग, दुर्धर आजार व चिमुकले बाळ असलेल्या महिला शिक्षकांनाही जिवतीसारख्या अवघड क्षेत्रात पाठविले असताना एका शिक्षिकेसाठी शिक्षण विभाग लाचार झाल्याचेही शैक्षणिक वर्तुळात बोलले जात आहे. दरम्यान, इतर काही शिक्षकांना सुगम क्षेत्रात नियुक्ती दिली असती तर काही हरकत नव्हती. मात्र, एका शिक्षिकेसाठी शिक्षण विभागाचे अधिकारी हतबल झाले असल्याचेही बोलले जात आहे. या नियुक्तीमागे कोणत्या शक्तीने काम केले याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पवित्र प्रणालीअंतर्गत सुरू असलेल्या भरती प्रक्रियेचा हा अपवित्र कारनामा पुन्हा उजेडात आल्याने शिक्षकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली होती. यापैकी प्राथमिक विभागातील १३२ शिक्षकांपैकी तब्बल १३१ शिक्षकांना अवघड क्षेत्रात नियुक्ती देण्यात आली आहे. सर्वाधिक १३० शिक्षक जिवती तालुक्यात तर एका शिक्षकाला कोरपना तालुक्यात नियक्ती देण्यात आली आहे. मात्र, चिमूरच्या कोमल सत्यनारायण मडपूवार या शिक्षिकेला सुगम क्षेत्र असलेल्या चिमुरातच नियुक्ती देवून शिक्षण विभागाने नियमांचे वाभाडे काढले आहे.
शिक्षक बदली समुपदेशन प्रक्रियेत दुर्धर आजार अंतर्गत ‘आजार प्रमाणपत्र’ सादर केलेल्या प्रमाणपत्राची शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी पडताळणी न करता, बनावट प्रमाणपत्र आधारे केलेल्या बदल्या शासन निर्णयाच्या दृष्टीने बेकायदेशीर ठरतं असल्याने, आणि नियमांचे उल्लंघन केल्याने,शिक्षणाधिकारी प्राथमिक (राजकुमार हिवारे) जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी म.ना.से (वर्तणूक) नियम १९७९ चा भंग केल्याने, शिस्तभंग विषयक कार्यवाहीस पात्र ठरतात. परंतु वर्ग २ कर्मचारी यांना वरिष्ठांचे वरदान असते असाच अनुभव आहे.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.