ब्रह्मपुरी क्षेत्रात सतत 10 वर्षांपासून काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार हे सतत दोनदा निवडून आले असल्याने त्यांचे परिचय हे मोठ्या प्रमाणात आहे. मात्र कृष्णा सहारे हे चिमूर विधानसभा क्षेत्रातील असून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आहेत. आणि ब्रह्मपुरी क्षेत्रासाठी नवीनच उमेदवार आमदार म्हणून बीजेपी ने दिल्या असल्याने एकतर्फी निर्णय होतो कि टक्कर ची लढाई होणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागलेले आहे.
काँग्रेसचे वजनदार नेते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे सोबत त्यांची लढत होणार आहे. उमेदवार हे बाहेरील क्षेत्राचे असून ब्रम्हपुरी क्षेत्रात फार संपर्क नसल्याने क्षेत्रातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. भाजपकडून प्रशांत वाघरे, अविनाश पाल यांची नावे चर्चेत असतांना अचानक कृष्णा सहारे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने सावली तालुक्यात सोशल मीडियावर सार्वजनिक नाराजी व्यक्त करतांना भाजपचे कार्यकर्ते दिसत आहे. त्यामुळे नाराजीचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Related posts


