श्री अमोल निनावे
संपाद्क :झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
ब्रम्हपुरी : सतत 2 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात विकासाचा झंझावात निर्माण करणारे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज २८ ऑक्टोबर रोजी ब्रम्हपुरी उपविभागीय कार्यालयात हजारोंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.अर्ज दाखल करण्यापूर्वीच चाहते, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला.
सावली,सिंदेवाही आणि ब्रम्हपुरी तालुक्यातील गावखेड्यातील हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मैदान ब्रम्हपुरी येथे एकत्र गोळा झाले होते.या वेळेस बैल बंडी व ढोल तासाच्या गर्जनेने ब्रह्मपुरी नगरी पूर्णपणे दुमदुमली होती. लोकांच्या मनात आणखी एकदा आम्ह्चे भाऊच निवडून आले पाहिजे असे जणू वाटत होते. मोठ्या आवाज करून ब्रह्मपुरी क्षेत्रातील लोक “विजुभाऊ तुम्ह आगे बढो हम तुम्हारे साथ हें “असे नारे देत होते. त्यामुळे तेच उत्साह आणि ऊर्जा लोकांच्या बोलण्यावरून दिसून येत होती.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा नामांकन अर्ज भरण्यासाठी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल निवडणूक प्रभारी महाराष्ट्र काँग्रेस हे प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रतिनिधीशी बोलतांना विजय वडेट्टीवार म्हणाले की,आजवरच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत जनता मला एक लाखापेक्षा ज्यास्त मताधिक्याने निवडून देईल.जनतेचे प्रेम बघून विजय वडेट्टीवार यांना गहिवरून आले.
बैल-बडी वरून पारंपरिक पद्धतीने हजारोंच्या संख्येने रॅली काढत नामांकन अर्ज दाखल करण्यात आला.