संपाद्क :झुंज सत्याची
श्री अमोल निनावे
मो. न. 9764271316
सिंदेवाही :- मागील पन्नास वर्षांपासून जिल्हात तथा तालुक्यात कांग्रेस पक्षाचे एकनिष्ठ राहिलेले चंद्रशेखर गंगाधर चन्ने हे अंतर्गत कलहामुळे काॅंग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. चंद्रशेखर चन्ने हे विजयभाऊ वडेट्टीवार याचे खुप निकटवर्ती व विश्वासू कार्यकर्ते आहेत हे विशेष!
मागील पन्नास वर्षांत तालुक्यातील राजकारणात हातखंडा असलेल्या चंद्रशेखर चन्ने हे पक्षाचा प्राथमिक सदस्याचा राजीनामा देणार असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सर्वात अगोदर काॅंग्रेस पक्षाकडून पंधरा वर्षे अविरोध ग्रामपंचायत कन्हाळगाव चे सरपंच राहिले आहेत तसेच पक्षात राहून अनेक पद त्यांना स्वबळावर मिळवली आहे तसेच पक्ष वाढीसाठी खूप मेहनत घेतली आहे. पक्षात राहून त्यांनी पंचायत समिती सभापती सिंदेवाही, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदेवाही, अध्यक्ष सेवा सहकारी सोसायटी, विविध सहकारी सोसायटी सदस्य, सदस्य तालुका खरेदी विक्री समिती सिंदेवाही, 30 वर्षे अध्यक्ष काँग्रेस कमेटी गुंजेवाही यासारखी विविध पदे भोगली.
चंद्रशेखर चन्ने ह्यानी पक्षात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस पद तसेच महाराष्ट्र प्रदेश संघटक काॅंग्रेस कमेटी यासारखे पदे पक्षांनी दिली.
हे एवढे सगळे असताना सुद्धा तालुक्यातील राजकारणात त्याच्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याने व नवशिक्या कार्यकर्ते यांना जवळ घेतले जात आहे.
त्यामुळे चंद्रशेखर चन्ने हे कांग्रेस पक्षाचा राजीनामा हे जिल्हा काँग्रेस कमिटी तथा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीे कडे देत असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे.या मुळे काँग्रेस ला समोर धोका पोहचण्याची श्यकता आहे.


