निवडणुकीचे कारण सांगून प्रत्यक्षात जाणीवपूर्वक महसूल विभाग करीत आहें रेती चोरी करणाऱ्यांकडे दुर्लक्ष्य.
अंदरून हात तर रंगवले नसणार नं अशी आहे तालुक्यात चर्चा
वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे लक्ष्य देण्याची गरज
श्री अमोल निनावे
संपाद्क :झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
श्री अमोल निनावे
संपाद्क :झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही तालुक्यातील नदी घाट सुरु नसताना सुद्धा रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक जोरात सुरू असल्याचे चित्र आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे की महसूल विभाग कोमात आहे असे चित्र दिसून येत आहे. महसूल विभागाच्या मूकसंमतीने हा प्रकार सुरू असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.
सध्या सिंदेवाहीसह लोणवाही, पळसगाव, डोंगरगाव, लाडबोरी, कळमगांव, जामसाळा, मोहाळी, शिवणी, वासेरा,नवरगाव, देलनवाली या परिसरात बांधकामे जोरात सुरू आहेत. त्यामुळे या भागात रेती माफियांकडून रेतीचा पुरवठा होत आहे. कळमगांव, गडबोरी, लाडबोरी, देलणवाडी या नदीपात्रातून अवैध उत्खनन करून रेतीची दिवसरात्र वाहतूक सुरू असल्याचे चित्र आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यात रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने, रेतीमाफियांकडून रेती अव्वाच्या सव्वा भावात विक्री करीत असल्याचे चित्र आहे. यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर, लाखो रुपयांच्या महसूलला चुना लागत असल्याचे चित्र आहे. नदीपात्रात उत्खनन होत असल्याने खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रेती माफियांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
कळमगांव, गडबोरी, लाडबोरी, देलणवाडी या नदीपात्रातून रात्रंदिवस रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याचे चित्र आहे. महसूल विभागाच्या दुर्लक्षतेमुळे रेती माफिया दिवसाढवळ्या रेतीची अवैध वाहतूक करीत असल्याचे दिसून येत आहे. दररोज शेकडो ब्रास रेतीची चोरी होत असल्याचे चित्र आहे. तेव्हा महसूल विभाग कोमात आहे की काय अशी शंका नागरिकांना पडली आहे.


