श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
ती अफाट गर्दी
कुठं संपली आहे ?
तुम्हीच फितूर
जनता आशेत आहे !
नाव घेता एकीचं
ठक बाबा सारे
निपचित दडून
खेळ करतात सारे
पेटल वादळ शमलं
की भरलं उदर ?
प्रश्न संपले की
भविष्य झालं सुकर ?
कुठं शोधावा तो
जीवंत वाघ आता ?
प्रश्न एकतेचा
जमजून घ्या आता
लढले जेव्हा दमान
केलं सळो कि पळो रे
आशेत सारे व्याकुळ
बीळ सोडून निघा रे
आवाज कुणाचा विसरून जरा आता रे !
लढणं रक्तात आहे दाखवा जरा आता रे !
कुठे गेले ते एकीची
डरकाळी फोडणारे ? कुठं लपले ते वाघ ज्वलंत प्रश्न मांडणारे ?
गोठ्यातील चारा
असेलही चवदार रे ?
अजूनही किती दिवस
दावनिला चरता रे ?
आक्रोशाने मशाली क्रांतीच्या पेटवा !
एकीकृत लढाया शांतीच्या दाखवा !
संधी चालून आली
सोनं संधीच करा रे !
विसरेल जनता आता ध्यानी जरा धरा रे !
-सागर शंभरकर
नागभिड ७०२०४५७५५६


