अंतरंगाव ग्रामपंचायतचे पूर्णपणे होतो याकडे दुर्लक्ष
ग्रामपंच्यात वरतीच कारवाही करण्याची मागणी
श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत कार्यालयांतर्गत गावाबाहेरच्या आवारात सकाळी आणि सायंकाळी उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सकाळ-संध्याकाळ गुलाबी थंडीत फिरायला जाणाऱ्या नागरिकांना दोन मिनिटे उभे राहणेही कठीण झाले आहे. विशेष म्हणजे, उघड्यावर शौचाला बंदी असून, ग्रामपंचायत कार्यालयांतर्गत अनेक ठिकाणी सार्वजनिक शौचालये असूनही त्याकडे नागरिकांनी पाठ फिरवून उघड्यावर बसणे पसंद केले आहे. त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र दुर्गंधी पसरली असून, गावात रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने या प्रकाराकडे त्वरित लक्ष घालून उघड्यावर बसणाऱ्या नागरिकांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी
करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना सुविधा मिळूनही त्याचा पुरेपूर लाभ घेत नाहीत.
‘स्वच्छ भारत मिशन’ योजनेंतर्गत प्रत्येकाला वैयक्तिक शौचालय बांधणे आणि शौचालयाचा वापर करणे, यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले. तरीही नागरिक त्या शौचालयाचा वापर करीत नाही. नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयातील निधीचा शौचालय सुविधेसाठी पुरेपूर लाभ घेतलेला आहे. परंतु नागरिकांना ग्रामपंचायत कार्यालय दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक सार्वजनिक शौचालयाचाही वापर करीत नाही, हे विशेष त्यापैकी अंतरंगाव ग्रामपंच्यात हि सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव मार्गाकडे जाताना रस्त्यावरती असून मेन रोडच्या दोन्ही बाजूला रांगोळीने रस्ते सजविल्या जाते त्या प्रमाणे विष्ठेने लोक रस्ते सजवून ठेवतात. मात्र त्या कडे ग्रामपंच्यातचे पूर्णपणे दुर्लक्ष्य होत असून वरिष्ट अधिकारी यांनी ग्रामपंच्यात वरतीच कारवाही करावी अशी मागनी अंतरंगाव मधील रहिवाशी तसेच त्या मार्गाने येणारे सुजाण नागरिक करीत आहे.
“स्वछ सुदंर रस्ते,
गावाचे गुलदस्ते”
हि मन या गावाला लागू होताना दिसत नाही.


