घ्या पावती शून्याची आणि दया शंभर रुपये, पंचायत समिती परिसरातील आधार केन्द्रातील अजब कारभार
कंपनी काम केल्याचे मानधन देत नसल्याचे आधार केंद्र चालकाचे मत
वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे लक्ष्य देण्याची गरज
श्री अमोल निनावे
संपाद्क :झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही : लहान असो की मोठा आधार कार्ड सर्वांना बनवावेच लागते. आधार कार्डचे बनविन्याकरिता संबंधित विभागाने शुल्क सुद्धा ठारविण्यात आले आहे आणि तशी पावती सुद्धा लाभर्थ्यांना देण्यात येते. मात्र, पंचायत समिती येथील आधार कार्ड केंद्रावर एका पालकाने आपल्या २१ महिन्याच्या लहान मुलाचा आधार बनविले असता पावती शून्याची देवून चक्क त्या ऑपरेटरने शंभर रुपये घेतल्याचा प्रकार उघड़किस आल्याने सध्या आधार केंद्राकडून नागरिकांची आर्थिक लूट सुरु असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येते आहे.
केंद्र सरकारच्या नियोजन मंडळांतर्गत जानेवारी २००९ मध्ये युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया या प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. २९ सप्टेंबर २०१० ला आधार योजनेअंतर्गत पहिल्या क्रमांकाचे वितरण महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या टेंभली गावातल्या रंजना सोनवणे या महिलेला करण्यात आले. मार्च २०१६ मध्ये आधारला वैधानिक आधार देण्यासाठी संसदेत एक मनी बिल सादर करण्यात आले आणि मार्च २०१६, आधार (आर्थिक आणि इतर सबसिडी, लाभ आणि सेवांचे लक्ष्यित वितरण) कायदा २०१६ लोकसभेत मंजूर करण्यात आला. देशभरात कोणत्याही शासकीय, निमशासकीय योजनांचा असो किंवा इतर क़ामाकरिता आधार कार्ड जवळ असने अनिवार्य झाले आहे. त्यामुळे लहान मुलापासुन तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आधार कार्ड काढावा लागतोच. याकरिता संबंधित विभागाने देशभरात आधार केंद्र नमून दिले आहे आणि आधार कार्ड काढण्याकरिता शुल्क सुद्धा भरावे लागते. मात्र, नियमाने ० ते ५ वर्ष वयोगटातील नवीन आधार कार्ड काढण्याकरिता कोणताही शुल्क लागत नसल्याने पावती शून्याची निघत असते. अशातच, गणेश भाष्कर निकुरे रा. सिंदेवाही यांना आपल्या २१ महिन्याच्या लहान मुलाचा आधार कार्ड काढायचे होते. त्याकरिता ते पंचायत समिती सिंदेवाही परिसरात असलेल्या आधार केंद्रावर गेले आणि आपल्या मुलाचे आधार कार्ड काढण्याची रितसर प्रक्रिया पूर्ण केली. आधार कार्ड काढल्यानंतर निकुरे यांना आधार ऑपरेटरने एक पावती दिली आणि शंभर रुपये झाले तुम्हचे म्हणून पैशाची मागणी केल्याने निकुरे यांनी आधारची पावतीची पढताळणी केली असता पावती “शून्य” रूपयाची होती त्यामुळे निकुरे यांनी शंभर रुपये कशाचे, पावती तर “शून्य” रूपयाची निघाली आहे अशी आधार ऑपरेटरला विचारणा केली. त्यावर आधार ऑपरेटर यांनी कंपनी आम्हाला याचे मानधन देत नाही त्यामुळे आम्ही सर्वांकड़ून शंभर रुपयेच घेतो अशे म्हणू लागल्याने निकुरे यांनी ऑपरेटरला शंभर रुपये दिले.
ही तर नागरिकांची लूट
आधार केंद्रावर आधार कार्ड काढल्यानंतर पावती “शून्य” रूपयाची देण्यात येते. मात्र, आधार केंद्राकडून शंभर रुपये घेतले जात आहे. आधार केंद्र चालकांकडून केली जाणारी ही लूट नेमकी कोणाच्या आशीर्वादाने केली जात आहे? यावर संबंधित विभाग, कंपनीने लक्ष द्यावे व नागरिकांच्या होणाऱ्या लूटवर आळा घालून संबंधित ऑपरेटरवर करवाई करण्याची मागणी नागरिकांकड़ून केली जात आहे.


