वस्तीला लागून कोणत्याही प्रकारचा चर्च तयार होऊन नये यासाठी लोकवस्ती वाल्यांनी दिले निवेदन
श्री अमोल निनावे
संपाद्क :झुंज सत्याची.
मो. नं. 9764271316
सिंदेवाही नगरपंच्यात मध्ये येत असलेल्या लोणवाही गावातील वार्ड क्र.2च्या वसाहती मध्ये अनेक लोकांची घरे असून मधेच घराच्या बाजूला लागून एका वेक्तीगत प्लॉट धारकाने या दोन महिन्या अगोदर वेक्तीगत नावानी प्लॉट घेऊन आपल्या प्लॉट वरती लोकांना सोबत घेऊन भूमिपूजन केले.त्या वेळेस भूमिपूजन करताना त्यांच्या सोबत वाद्य सुद्धा आणले होते त्यामुळे आजूबाजूच्या लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने त्यांनी त्या लोकांना इथे काय बनवणार आहात असे विचारणा केली असता त्यांनी आम्ही या जागेवरती चर्च बनवत असल्याचे सांगितले. त्यामुळे वस्ती मध्ये सगळीकडे चर्चाला उधाण येऊन अखेरीस बांधकाम करण्याच्या अगोदर समस्त लोणवासीय गावकरी मंडळी यांनी आज तहसीलदार सिंदेवाही, नगरपंच्यात कार्यलय,तसेच पोलीस स्टेशनला निवेदन देऊन ते बांधकाम वस्तीला लागून होऊ नये म्हणून निवेदनाच्या माध्मयातून माहिती दिली.त्यामुळे लोकवस्ती असलेल्या ठिकाणी मधेच हें बांधकाम होत असल्याने लोकांच्या मनात नाराजीचे सूर वाहत असून ते बांधकाम आम्ही करूच देणार नाही असे त्यांनी माध्यमाच्या समोर सांगितले आहे.निवेदन देताना समस्त लोणवाही वार्ड क्र. 2 मधील नागरिक उपस्तिथ होते.


