श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही मध्ये सगळीकडे राजकीय वातावरण चांगलेच तापत असून अश्यातच लोणवाही वार्ड क्र. 2 चे रहिवाशी असलेल्या सर्व नागरिकांनी एकी पुकारले असून त्यांनी सरळ आपले मनोगत बोर्ड वरती फलक लावून दाखवून दिले आहे.
लोणवही मधील “श्री कृष्ण नगर “मध्ये असलेल्या वसाहती मध्ये श्री कृष्ण नगर या बोर्डावरती हें फलक लागलेले आहे. “या कॉलनीत राजकीय लोकांना प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे “,”आम्हची कॉलनी आम्ह्चे सरकार”असा फलक लावल्याने सर्व सिंदेवाही वाशीय जनतेचे तसेच राजकीय लोकांचे लक्ष्य या फलकाकडे लागलेले आहे.
नेमका हा फलक लावण्याचे कारण काय असेल .त्या वार्डात येत्या 5 वर्षात कोणतेही विकास कामे झाले नसून कोणीही या वार्डाकडे लक्ष्य देत नाही त्यामुळे आम्ही आम्ह्चे कामे बघून घेत असतो. मग आम्ही राजकीय लोकांच्या मागे लागून काय फायदा या पेक्ष्या राजकीय लोकांनी आमच्या वार्डात तोंड दाखवून आपले अपमान करून घेऊ नये यासाठी हा फलक लावलेले तर नसणार नं असा प्रश्न आता सर्व सिंदेवाही वाशीय जनतेमध्ये पडलेला आहे. त्यामुळे या वार्ड कडे आतातरी लक्ष्य देणार काय ?कि समोर पण असेच फलक लावून लोक बहिष्कार घालणार असे विचार सर्वसाधारण नागरिक करित आहेत. असेच कामे जर प्रत्येक वार्डात होतील तर राजकीय लोकांना नकीच जाग येणार विकास काम करण्याचे हें तर या वार्डातील लोकांना दाखवायचे नसेल नं ?अशा सुद्धा प्रश्न लोकांना पडलेला आहे.


