श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही मधील अनेक प्रभाग मध्ये रोड तसेच नाल्याचे कामे पावसामुळे व निवडणुकीमुळे थांबलेले होते. मात्र निवडणूक संपताच प्रत्येक प्रभागात नालीचे बांधकाम सुरु झालेले आहेत.
अश्यातच वार्ड क्र. 2 च्या कृष्ण नगर च्या समोर असलेल्या वस्तीच्या गली मध्ये नालीचे बांधकाम नुकतेच सुरु झाले असून लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. असेच विकास कामे जोरात सुरु झाली तर प्रत्येक गलोगली मध्ये नाले तसेच रॊड पाहायला मिळतील असे लोकांचे मनोगत एकाला मिळत आहे.
प्रभाग क्र. दोन हि अगोदर ग्रामपंच्यात मध्ये येत असल्याने अनेक विकास कामे रखडलेली होती. मात्र आता नगरपंच्यात मध्ये गेल्याने विकास कामाला जोरदार सुरुवात झाली असून प्रभाग क्र. 2 चे नगरसेवक पंकज नन्नावरे यांनी वार्डाच्या विकासासाठी कंबर कसली असून जेवढा निधी आपल्या प्रभाग करिता आणता येणार तेवढे निधी आणण्याकरिता पर्यंत करित आहेत.त्यामुळे नक्कीच वार्डाचे विकास काम होतील हें निश्चित झाले आहे.


