*ब्रह्मपुरी क्षेत्रात काँग्रेसचे उमेदवार श्री विजय वडेट्टीवार यांनी सतत तीनदा जिकून आपली हॅट्रिक पूर्ण केली*.
श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात निवडणुकीचे आज निकाल लागले असून यात 14000मतांनी काँग्रेसचे आमदार श्री विजय वडेट्टीवार हें विजयी झाले.ब्रह्मपुरी क्षेत्रात माजी आमदार तथा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार काँग्रेस पक्षाकडून तर महायुतीचे उमेदवार (bjp)क्रिष्णा सहारे या दोघात भिडत होती. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या गावात आपलें आपलें उभे असलेल्या नेत्याचे शक्तिप्रदर्शन केले. .त्यामुळे ब्रह्मपुरी मध्ये सतत दहा वर्षांपासून आमदार असलेल्या विजय चा विजय होणार कि नव्याने उभे असलेले उमेदवार क्रिष्णा यांचा कृष्ण चक्र ब्रह्मपुरी क्षेत्रात फिरणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. अखेरीस आज निकाल लागला असून यात विजय वडेट्टीवार यांनी आपली बाजू मारली असून 14000च्या मतांनी निवडून आले. त्यामुळे ब्रह्मपुरी क्षेत्रात हॅट्रिकचि बाजु त्यांनी मारून आपला विजय कायम ठेवला आहे.


