पोलिसांनी दिले लोकांना सावधानीचे इशारे.
श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
चंदपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात 09/12/2024 ला घडलेली घटना.
सविस्तर वृत्त असे कि एका सुजाण नागरिकाला एका वॉट्सअप काल वरून फोन येतो आणि मी sp बोलत आहे जिल्हा पोलीस स्टेशन मधून तुमच्या मुलाला आम्ही रंगे हात 6 मुलांसोबत पकडले असून त्याचा पूर्ण नाव त्यांनी बरोबर सांगितला तसेच अनेक मुलाचा रडणारा आवाज त्या मोबाईल वरती ऐकवला त्यांनी एका मुलीवरती गॅंग रेप केलेला आहे. त्यामुळे तुम्ही त्वरित मला फोन पे द्वारे मी ज्या नम्बर वरती पैसे टाकायला सांगतो त्या नम्बर वरती पैसे टाका अन्यथा त्याला सजा होणार. त्या भीतीने त्या सुजाण वेक्तीने आपल्या मुलाला वाचविण्याकरिता तुरंत मध्ये इकडून तिकडून हात उसनवार करून अर्ध्या तासात 30000(तीस हजार )पाठविले. आणखी पुन्हा लगेच फोन त्याच वॉट्सअप कालिंग वरून येऊन त्यांना तुम्ही मी तुमच्या मुलाला कोर्टात हजर केले असून जज साहेबांनी 70000(सत्तर हजार रूपये)जुर्माना ठोकला आहे त्यामुळे तुम्ही आणखी मला याच नम्बवरती तेवढे पैसे टाका. त्यामुळे त्या सुजाण नागरिकाला काही सुचेनासे झाले आणि त्यांनी आणखी इकडे तिकडे आपल्या रिस्तेदारी मध्ये फोन लावून पैसेची मागणी केली. मात्र नंतर त्यांच्या रिस्तेदारी मधील वेक्ती हुशार असल्याने त्यांनी विचारपूस केली असता त्या सुजाण नागरिकांनी अस अस झाले आहे म्हणून माहिती दिली तेव्हा कुठे त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी पैसे नं देता थेट पोलीस स्टेशन गाठले आणि त्यांना माहिती दिली. मात्र ते फ्रॉड कालिंग असल्याने डायरेक्ट ऑनलाईन तक्रार करावी लागते असे पोलीस स्टेशन मधून माहिती मिळाली आणि त्यानुसार त्या वेक्तीच्या कुंटुंब मधील मुलांनी ऑनलाईन तक्रार केली. त्यामुळे कोणीही अश्या फसवेगिरीच्या फोन ला बळी पडून पैसे टाकू नका अशी माहिती सिंदेवाहीच्या पोलीस स्टेशन मधून देण्यात आली आहे.
(फोन करने काहीही कारण सांगून लोकांचे पैसे उकडविणे हें काम दिवसेंदिवस वाढत चालेले आहे मात्र या वर आपल्याकडे सुविधा नसल्याने अनेक लोकांना आपलें पैसे गमवावे लागत आहे:-एक सुजाण नागरिकाचे मनोगत).
सायबर पोलीस द्वारे अनेक माहिती लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य सुरु असून सुद्धा अनेक सुशिक्षित लोक अश्या भूलथापा कालिंग ला बळी पडत आहे त्यामुळे आम्ही आणखी कस लोकांना माहिती देता येणार या कडे पर्यंत करू अशी माहिती सिंदेवाही पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक श्री सागर महल्ले सर यांनी माध्यमासोबत बोलताना दिली.