रोजगाराचे शोधात, बेरोजगारांची भटकंती!
स्थानिक खासदार, आमदार, मंत्री महोदय लक्ष्य देतील का?.
श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही : तालुक्यातील वाढत
असलेल्या बेरोजगारीच्या समस्येमुळे अनेक युवक जिल्ह्याबाहेर कामाच्या शोधात पलायन करीत आहेत. रोजगाराच्या शोधात असलेल्या हाताला काहीच काम मिळत नाही. त्यामुळे सिंदेवाही तालुक्यात उद्योगाची निर्मिती करून बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ची ओसाड जागेत नवीन रोजगाराचे दृष्टीने निर्मिती करावी अशी मागणी युवकांकडून होत आहे.
सिंदेवाही तालुक्यात रोजगार निर्मिती होईल अशा प्रकारचे कोणतेच कारखाने नसल्यामुळे हाताला काम नाही. तालुक्यात केवळ धान पिकांचे शेतीवर येथील नागरिकांना अवलंबून रहावे लागत आहे. जिल्ह्यात असलेल्या कंपनीमध्ये सुशिक्षीत विद्यार्थी व युवकांना प्राधान्य देण्यात आले नसल्याने परिणामी मोठ्या संख्येने शिक्षित असलेला युवक वर्ग व विद्यार्थी वाईट मार्गाकडे वळत आहे. त्यामुळे तालुक्यात उद्योग उभारून बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल अशी मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे, धानावर आधारिक उद्योग उभारल्यास
शेतकऱ्यांसह परिसरातील युवकांनाही याचा लाभ होणार आहे. तालुक्याची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) म्हणजे महाराष्ट्र सरकारची प्रमुख औद्योगिक पायाभूत सुविधा विकास संस्था. या दृष्टीने काही प्रमाणात ओसाड पडली आहे. या कडे रोजगाराचे दृष्टीने लक्ष देणे गरजेचे आहे.
याकडे स्थानिक आमदार तथा खासदार व मंत्री लक्ष्य देतील का असा प्रश्न सुशिक्षित युवक तसेच नागरिकांकडून होताना दिसत आहे.


