शहर पोलिस ठाण्यांतर्गत पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकून अमली पदार्थ (गांजा) व इतर साहित्य जप्त करून आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला
श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
चंद्रपूर सिटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री एकुरके मॅडम यांनी चांगलीच गुन्हेगार विरुद्ध कम्बर कसली असून गुन्हेगारी प्रवूत्ती असलेल्या लोकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
Accused arrested with drugs
मिळालेल्या माहितीनुसार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस गाडी शहरात गस्त घालत असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, आरोपी शारिक जलील क्रेशी (25, रा. बिनबा चौक, घुटकाळा, दर्गा वार्ड) याच्या घरी काही अमली पदार्थ आहे त्यामुळे त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आले.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीच्या घरातून गांजा, रोख रक्कम, लोखंडी रॉड आणि 5 तोळे, तसेच मूळ रक्कम नगद 500 रुपयांचा माल जप्त केले.
त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 8(C), 20(B) IIA, Cr 4,25 आर्म्स ऍक्ट, Cr 135 महाराष्ट्र पोलीस कायदा इत्यादी अंतर्गत गुन्हा नोंदवला.
हि कार्रवाही जिल्हा पोलीस स्टेशनचे पोलीस अधीक्षक श्री मुमक्का सुदर्शन, जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक श्री रीना जनबंधू तथा डीवायएसपी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रभावती एकुरके, एपीआय राहुल ठेंगणे, संदीप बच्छिरे, दत्तात्रय कोलते, पी.सी. कापूरचंद खरवार, भावना रामटेके, इम्रान शेख, सचिन राठोड, इम्रान खान, दिलीप कुसराम, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम यांनी केली. पुढील तपास पीएसआय पल्लवी काकडे करत आहेत.


