श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
दि. 19/12/2024 रोज गुरुवारला विरव्हा ग्रामपंचायत विरव्हा अंतर्गत येत असलेल्या खातेरा येथे आय. सी. आय. सी. आय फाउंडेशन च्या माध्यमातून भूमिपूजन करण्यात आले,मागील तीन वर्षांपासून आय. सी आय. सी आय फाउंडेशन गावामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवित असून, शेतकऱ्यांना रब्बी करिता बियाणे, पशुपालकांना गोट फीडर, कुक्कुटपालन, बायो पेस्टीसाईड युनिट,, वाडी प्रोजेक्ट, कारला बियाणे,SRT, SRIपद्धतीने भात लागवड, गावात रोजगार मिळावा या उद्देशाने फळबाग लागवड असे विविध उपक्रम राबवित असून या वर्षी खातेरा येथे छोटे तलाव असून खोलिकरण नसल्याने पाण्याची पातळी कमी असते, त्यामुळे भाताचे पीक घेने सुद्धा कठीण होते, गावकऱ्यांनी आय. सी. आय. सी आय. फाउंडेशन कडे तलाव खोलीकरण ची मागणी केली असता आय. सी. आय. सी आय.फाउंडेशन कडून निधी उपलब्ध झाला,शेतकऱ्यांना रब्बी पीक घेता येईल, गावात पाण्याची पातळी वाढावी, जाणवरांना पाणी पिण्यास भटकंती करावी लागणार नाही या उद्देशानेआज भूमिपूजन करण्यात आले व उद्यापासून कामाला सुरवात करण्यात येणार आहे, या कार्यक्रमा प्रसंगी आय. सी.आय.सी.आय बँक चे (MD)संदीप बत्री सर,(PM)पवार सर ICICI फाउंडेशन, (DO)सामृतवार सर ICICI फाउंडेशन,शेंडे मॅडम (ग्रामसेविका )विरव्हा, छायाताई चौधरी (सरपंच)विरव्हा,प्राजक्ता पाटील मॅडम (CF)आय. सी. आय.सी.आय फाउंडेशन गावातील जेष्ठ नागरिक शंकर नन्नावरे, रामकृष्ण मडावी, सोनबा कुंभरे (PRT)भोजराज आळे,लक्ष्मीताई वेलादी आशावर्कर, परचाके ताई अंगणवाडी सेविका व गावातील पुरुष, महिला यांचे उपस्थितीत कार्यक्रम पार पाडण्यात आला, कार्यक्रमाचे संचालन, संदीप कुंभरे तर प्रास्ताविक शांताराम आदे(CF) आय. सी.आय. सी. आय. फाउंडेशन यांनी केले व अनिल आत्राम(PRT)यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.


