खुलेआम रेती तस्करी सुरु मात्र महसूल विभाग गाड झोपेत.
श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही तालुका हा मोठ्या प्रमाणात महसूल विभागातील अधिकारी यांच्यासाठी मह्त्वाचा ठरत असतो. कारण या तालुक्यात मोठ्या प्रमाणात नदी नाले असून हें तालुक्याच्या चारही बाजूने पसरलेले आहेत. त्यामुळे कोणत्याही बाजूने रेती तस्करी करण्याऱ्या लोकांना केव्हाही रेती चोरी करायला वेळ लागत नाही.
अश्यातच या वर्षीचा विचार केला असता खुलेआम रेती तस्करी सुरु असून बे भाव दराने रेती विक्री सुरु आहे. मात्र याकडे महसूल विभागाचे लक्ष्य पाहिजे त्या प्रमाणात आढळून येताना दिसत नाही.
अनेक गोर गरीब लोकांना घरकुल आलेले आहे मात्र हातावर मोजण्या इतके पैसेच सरकार कडून मिळत असल्याने तेव्हढ्याश्या पैसेत आपल्या घराचे सामान घेतील कि 2000 ते 3000 भावाची रेती घेतील, असे अनेक समश्या लोकांच्या समोर निर्माण झाल्याने आता घरकुलचे घरे बांधणे कठीण झालेले आहें.
सिंदेवाही तालुक्यात नवीन तहसीलदार यांची मागणी करताना सुद्धा दबक्या आवाजात आढळून येत आहे.
वर्षातून फक्त एकादी कार्रवाही एकाद्या ट्रॅक्टर वरती करून बाकीचे ट्रॅक्टर रेती चोरी करताना दिसत आहे मात्र याकडे पूर्णतः दुर्लक्ष्य होताना आढळून आल्याने नेमका सिंदेवाही तालुक्यात काय प्रकार सुरु आहे असे ससंप्त प्रश्न आता जनता करित आहे. अन्यथा नवीन अधिकारी सिंदेवाही तालुक्याला मिळावा अशी अपेक्षा आता लोकांच्या मुखातुन निघत आहे.