श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
स्नेहमिलनाचा आज दिनांक 29 जानेवारी 2025 या तिसऱ्या दिवशी सर्वोदय विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सिंदेवाही च्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण सर्वोदय महाविद्यालयाच्या पटांगणावरती पार पडले.सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन विद्या प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष सौ गीतांजली अरविंद जयस्वाल यांचे शुभहस्ते पार पडले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्या प्रसारक संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय योगेंद्रजी जयस्वाल हे उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री किशोर पिसे सर, केंद्रप्रमुख श्री उईके सर ,प्राचार्य डॉक्टर डहाळे, सर प्राचार्य श्री केकरे सर ,प्राचार्य कुमारी यादव मॅडम ,मुख्याध्यापक नंदनवार सर ,पर्यवेक्षक धुळेवार सर ,सुकारे सर तसेच शालेय मुख्यमंत्री शंतनू हे प्रामुख्याने उपस्थित होते. विद्या प्रसारक संस्थेचे सन्माननीय सचिव तसेच या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे संयोजक श्री अरविंद जयस्वाल यांचे मार्गदर्शनाखाली सिंदेवाही नगरीत पार पडत आहे .या वार्षिक उत्सवाचं आयोजन संस्थेचे विविध शाखांद्वारे दिनांक 27 जानेवारी ते 30 जानेवारी 2025 पर्यंत केले आहे. आज 29 जानेवारी रोजी झालेल्या सर्वोदय विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी माननीय गटशिक्षणाधिकारी पिसे सर तसेच केंद्रप्रमुख उईके सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री योगेंद्र जयस्वाल साहेबांनी विविध दाखले देत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारे अध्यक्षीय मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य केंकरे सर तर आभार प्रदर्शन श्री सुकारे सर यांनी केले कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापिका बांगडे मॅडम तसेच प्राध्यापक प्रदीप मेश्राम सर यांनी केले सांस्कृतिक कार्यक्रमात सिदेवाही व परिसरातील अनेकांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाप्रसंगी विविध प्रकारच्या कार्यक्रमाचा आयोजन सर्वोदय विद्यालयातर्फे करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वोदय विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सिंदेवाही , सर्वोदय कन्या विद्यालय ,सर्वोदय महाविद्यालय ,सर्वोदय विद्यालय गडबोरी येथील सर्व कर्मचारी सहकार्य केले.


