श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही तालुक्यातील प्रत्येक गावात ॲग्रीस्टॅक कॅम्प चे आयोजन त्या त्या गावचे पटवारी करित असून देलनवाडी येथे ॲग्रीस्टॅक कॅम्प आज दिनांक 29/01/2025 रोज बुधवारला घेण्यात येत आहे. सर्व शेतकरी बंधूना आपलें कागदपत्रेघेऊन ग्रामपंच्यात इथे सादर करायचे आहे. .सर्व ७/१२ धारक शेतकऱ्यांना सूचित करण्यात येते कि, ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत आपला ७/१२ आधारला लिंक करावयाचा आहे. जेणेकरून तुम्हाला एक फार्मर आयडी मिळेल. ज्याद्वारे भविष्यातील सर्व योजनांचा लाभ तुम्हाला याद्वारे घेता येईल. जर आपण आपला फार्मर आयडी बनविला नाही तर आपल्याला पुढील योजनेचा लाभ मिळणार नाही.अशी माहिती दिल्या जात असून सर्व शेतकरी या योजेनचा लाभ घेण्याकरिता ग्रामपंच्यात मध्ये जाऊन आपलें फार्म भरीत आहेत. या साठी देलनवाडी येथील तलाठी श्री विकेश खरकाटे, ऑपरेटर मृणाल दागमवार तसेच पळसगाव गावाचे ऑपरेट प्रमोद मानकर व csc सेंटर चे सुधीर डोंगरवार हें यशवी रित्या कॅम्प राबवित आहेत.
शेतकरी माहिती संचाचे फायदे
1)एक वेळा नोंदणी आणि अनेक कल्याण कारि योजनेचा लाभ. आणि अनुदान वितरणांत सुलभता.
2)शेतकऱयांना वेळेवर कृषी विषयक सल्ले, विविध संस्थांकडून शेतकऱ्यांना संपर्क करण्याचा संधीसह वाढीसह नावीन्य पूर्ण कार्यक्रमाचा विस्तार प्रचारात सफलता.
3)पिकासाठी कर्ज मिळविण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रुक्टर फ़ंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्ज उपलब्ध करून घेण्यास सुविधा.


