श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही :-संत गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ सिंदेवाही द्वारा संचालित शरदचंद्र उच्च प्राथमिक शाळा सिंदेवाही येथे एक दिवसीय बाल रंगारंग कार्यक्रम घेण्यात आले.ह्यात एकल नृत्य,समूह नृत्य,नाटक,नक्कल,डब्बल नृत्य, फॅशन शो,गीत गायन,आदी कलाविष्कार दाखून प्रेक्षकांचे चिमुकल्यांनी मंत्र मुग्ध केले.फॅशन शोमधून भारताच्या विविधतातील एकता सर्व धर्म समभाव तेचा सुंदर संदेश दिला.ह्या कार्यक्रमाचे उदघाटक तथा अध्यक्ष संस्था सहसचिव प्रशांत के शेंडे सर होते तर प्रमुख पाहुणे कु कांता एम घुगुस्कर प्राचार्य, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष प्रवीण गिरडकर,सहसचिव रवींद्र सीडाम, माता पालक समिती सदश्य राजश्री साखरकर,कु.रत्ना मेश्राम झोडेजी ,प्रमुख अतीथी म्हणून वार्ताहर सुधाकर गजभिये ,राकेश बोरकुंडावार ,अमोल निनावे सा.यु. ब्रि.संस्था अध्यक्ष्य यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.प्रशांत शेंडे सरांनी. विद्यार्थ्यांनी निश्चित ध्येय गाठण्यासाठी पुढे बघावे मागे वळून बघू नये.सुधाकर गजभिये व घुगुस्कर मॅडम यांनी मार्मिक मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्रीकांत.के लाखे यांनी केले तर सूत्रसंचालन सहदेव खोब्रागडे सर यांनी केले आभार प्रदर्शन कु खेमलता जांभुळे यांनी मानले .कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण होण्याकरिता भारत आत्राम सर, सुनील काशिवार सर,चंचल कोल्हे सर,सागर जल्लावार सर,कु.यशोधरा बोरकर, गुलाब भोस्कर यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाची सांगता फॅशन शोने कऱण्यात आली.सर्व विध्यर्थी आणि पालकांनी शेवट्पर्यंत कार्यक्रम यशस्वी कऱण्यात मोलाचे योगदान दिले.


