अनेक शाळकरी तसेच प्रवाशी तात्काळत बसची वाट बघत असतात उभे,नवरगावचे राजकिय पुढारी यांनी याकडे लक्ष्य देण्याची गरज.
श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव या ठिकाणी जुने बस स्टॅन्ड माता चौक इथे आहे. सर्व प्रवाशी त्याच बस स्टॅन्ड वरती बसेसची वाट बघत असतात. मात्र आता सिंदेवाही ते चिमूर चालणारी बस ही डायरेक्ट अंतरंगाव सिंदेवाही फाट्या वरूनच जात असल्याने जे प्रवाशी मेन बस्टॅंड माता चौक इथे उभे वाट बघत असतात त्यांना आपली बस आता येणार थोड्या वेळात येणार याच भानगडीत तात्कळत राहावे लागतो. नंतर त्यांना वेळ झाली कि कळते कि बस ही डायरेक्ट मार्गाने निघून गेली आहे त्यामुळे त्या प्रवाशी लोकांना पायदळ अंतरंगाव फाट्यावरती येऊन कोणाला तरी परक्या वेक्तीला लिफ्ट मागून प्रवास करावे लागतो त्यामुळे या सर्व गोष्टीचा नाहक त्रास प्रवाशी लोकांना होत असल्याने नवरगाव वाशीय जनते मध्ये नाराजीचे सूर बस चालक वरती आढळून येताना दिसत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे लक्ष्य देऊन तात्काळ सर्व बसेस माता चौक इथे नेऊनच प्रवाशी लोकांना बसवावे व तिथे प्रवाशी लोकांना उतरवून द्यावे. अन्यथा आंदोलनाचे पावूल उचलावे लागेल.सामाजिक युवा ब्रिगेड संघठनेचे अध्यक्ष्य श्री अमोल निनावे यांनी दिली माहिती.


