दारूचा वेषन पडतो गरीब लोकांना महाग
चौका चौकात दारूचे थाटले दुकाने
दारू पिऊन गाडी चालवल्यास सहा महिने तुरुंगवास किंवा १०,०००/- रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात
श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो.नं. 9764271316
चंद्रपूर जिल्ह्यात अनेक वर्ष दारू बंद होती. मात्र त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याला टॅक्स मिळावा या करिता दारूचे दुकान पूर्वरत सुरु कऱण्यात आले.
मात्र दारूचे दुकानाला नव्याने अनेक लोकांना परवानगी मिळाल्याने गलोगली मध्ये अनेक बार, देशी दारूचे दुकान, वाईन शॉप सुरु झाले. त्यामुळे अनेक दारूप्रेमी लोक खुश झाले. पण ड्रिंक अँड ड्राईव्ह हे नियम त्यांना माहिती पडले आणि कार्रवाही सुरु झाले तेव्हा मात्र हिरमुसले.चंद्रपूर जिल्ह्यात सुरु कऱण्यात आलेली दारू मुळे लोकांना 50 रु च्या एका देशी दारूच्या बॉटलच्या मागे मोजावे लागतो 10000रु दंड.
चौका चौकात आता दारूचे दुकान सुरु झाल्यामुळे अनेक गोरगरीब लोक आपलें वेवसाय करून सायंकाळच्या वेळेस घरी जाण्याअगोदर आपली तहान भागविण्याकरिता दारूच्या दुकानात जाऊन दारू पिऊन बाहेर पडतात. मात्र बाहेर पडताच ट्राफिक पोलीस चौकात आपली ड्युटी निभावत असताना त्यांच्या लक्षात आले कि हे वक्ती ड्रिंक करून आहे तर त्याला लगेच मशीन नी चेक करून तो ड्रिंक केला असेल तर 10,000(दहा हजार) रूपे चा चालन मारतात. त्यामुळे अगोदरच जो वेक्ती रोजी रोटी करण्याकरिता दिवस भर घराबाहेर निघून आपल्याला सुखाची झोप लागावी म्हणून दारूचा थोडा आसरा घेतो अश्यातच त्याच्यावरती एवढा भुर्दड बसल्याने तो पूर्णपणे हिरमुसल्या जातो.
प्रशाशनाने एकतर गावाच्या बाहेर दारूचे दुकान सुरु करावे नाहीतर मग जे हायवे वरती ड्रिंक करून गाडी चालवतात त्यांच्यावरतीच कार्रवाही करावे असे मत आता लोकांच्या मुखातून निघत आहे.
“चाऱ्याण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला” अशी अवस्था आता दारू प्रेमी लोकांची झाली आहे.
यामुळे अनेक दारू प्रेमी हे सध्या या नियमावर्ती नाराजी वेक्त करताना दिसत आहे.


