श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सरांडी व खांडला हे दोन्ही गाव तालुक्याच्या टोकावर असून ये जा करण्या करिता एकच मार्ग आहे आणि त्या मार्गांवर कंत्राटदाराने गिट्टी व मुरूम टाकून रोलर च्या साह्याने पिचिंग केली परंतु मुरूम पुरेसा नसल्याने पूर्ण गिट्टी बाहेर निघालेली आहे व काम पूर्ण न करता सर्व लेबर अपूर्ण काम ठेऊन पळाल्याने दोन्ही गावातील नागरिक व शाळेकरी मुलांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे, रत्नापूर पासून सरांडी 9 किमी तर खांडला 7 किमी अंतरावर असून रस्ता जंगलाने वेडलेला असल्याने रस्त्यावर वाघ, बिबट, अस्वल अश्या हिंस्त्र प्राण्याचा वावर असल्याने रस्त्यामुळे शाळेकरी व नागरिकांना धोका निर्माण झाला आहे जर का कुणाच्या जीवाला धोका झाला तर याला सर्वस्वी जबादार कोण, करिता बांधकाम विभागाने या रस्त्याची पाहणी करून पूर्ववत दुरुस्ती करून कामाला सुरवात करावी अन्यथा शाळेकरी मुलं आणि दोन्ही गावातील नागरिक आंदोलन करणार असल्याचे दोन्ही गावचे नागरिक बोलत होते.


