सिंदेवाही मधील श्री प्रेमकुमार खोब्रागडे व त्यांची पत्नी यांचा झाला अपघात
एक उत्कृष्ट्य शिक्षक तथा भूक नाटकाचे लेखक यांना सिंदेवाही वाशीयांनी गमावले
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही :-आज दिनांक 03/04/2025 रोजी अंदाजे 12 ते 01 वा दरम्यान मृतक नामे प्रेमकुमार खोब्रागडे हे पत्नी सह मोटार सायकल क्र.MH 34 V 3324 या गाडीने प्रवास करित असताना महाजन इंडियन गॅस एजन्सीच्या समोर वळण मार्गावरती ट्रक क्र MH40CM3857 ने धडक दिल्याने प्रेमकुमार खोब्रागडे हे त्या धडकेत जागीच मृत झाले व त्यांची पत्नी ही किरकोळ जखमी झाल्याने उपचार करिता ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही मध्ये दाखल केले, मृतकचे शल्य चिकीत्सा चालू असून मृतकचे नातेवाईक यांचे तोंडी रिपोर्ट वरून सदर अपघातील ट्रक क्र MH40CM3857 वर गुन्हा नोंद सिंदेवाही पोलीस स्टेशन इथे केले असून पुढील तपास मा उपविभागीय पोलिस अधिकारी सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री विजय राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक महल्ले हे करीत आहेत.


