कांचन पांडे – एक कडक पण जनहितैषी अधिकारी
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
पोलीस निरीक्षक कांचन पांडे हे पोलीस दलात अनुभवी, शिस्तप्रिय व धडाडीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी अनेक ठिकाणी यशस्वीपणे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवून सामाजिक सुरक्षेला बळकटी दिली आहे. त्यांच्या कार्यशैलीत कडक शिस्त असूनही, सामान्य नागरिकांशी सहानुभूतीने आणि माणुसकीच्या नात्याने वागणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. अवैध धंदे, खाजगी गुंडगिरी, सामाजिक अस्थिरता याविरोधात त्यांनी अनेकदा कठोर पावले उचलली आहेत.
सिंदेवाहीमधील गुन्हेगारी नियंत्रणासाठी अपेक्षा वाढल्या
सिंदेवाही पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही काळापासून किरकोळ गुन्हेगारी, अवैध धंदे आणि स्थानिक वाद या समस्या वारंवार समोर येत होत्या. आता कांचन पांडे यांच्यासारख्या अधिकारी यांच्या बदलीमुळे सिंदेवाही परिसरात कायदा आणि सुव्यवस्था अधिक बळकट होईल, आणि स्थानिक गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसेल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
जनतेचा विश्वास आणि शुभेच्छांचा वर्षाव
पोलीस निरीक्षक पांडे यांनी जिथे जिथे काम केले, तिथे त्यांनी कायद्याचं राज्य प्रस्थापित करताना जनतेचा विश्वास मिळवला. त्यामुळे सिंदेवाहीमध्येही त्यांनी लवकरच आपला ठसा उमटवेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत. स्थानिक नागरिकांकडून त्यांना पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन दिले, आणि त्यांच्या कार्यकाळात या भागातील कायदा-सुव्यवस्थेत सुधारणा होईल, अशी आशा आहे*


