श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा चंद्रपूर च्या वतीने चंद्रपूर च्या खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांची वरोरा येथे भेट घेऊन निवेदन देण्यात आले. निवेदनात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थींना रुपये 2.50 लाखा पर्यंत जे अनुदान देणार होते ते मध्यम उत्पन्न गटातील लोकांना अजूनपर्यंत देण्यात आलेले नाही. ते त्वरीत देण्यात यावे अशी संघटने तर्फे मागणी करण्यात आली. ही योजना दिनांक 01.01.2017 ते 31.03.2021 पर्यंत सुरू होती. परंतु अजूनही अनुदान रक्कम लाभार्थींच्या गृह कर्ज खात्यात जमा करण्यात आलेली नाही. मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या योजनेचा गाजावाजा करून नागरीकांना बॅंके मार्फत कर्ज घेऊन घरे बांधण्यासाठी प्रोत्साहित केले व या योजनेचा लाभ घेण्यास सांगितले परंतु चार वर्षाचा कालावधी लोटूनही ब-याच मध्यम उत्पन्न गटातील लाभार्थींच्या गृह कर्ज खात्यात रूपये 2.50 लाख अनुदान जमा झालेले नाही. त्यामुळे कर्जदारांना मुळ अनुदान रक्कम रूपये 2.50 लाख व त्यावरील व्याज भरण्याची वेळ आली आहे. माननीय खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांना निवेदन देऊन स्थिती ची जाणीव करून देण्यात आली. त्यांनी हा प्रश्न लोकसभेत मांडण्याचे आश्वासन दिले व न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे कबुली दिली. संघटनेच्या वतीने परशुराम तुंडुलवार जिल्हाध्यक्ष, आनंद मेहरकुरे जिल्हा सचिव, देविदास नंदनवार जिल्हा संघटक व वरोरा तालुक्यातील प्रतीनिधी निळकंठ आमटे सोबत होते.


