श्री अमोल निनावे
संपाद्क :झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही:- लोणवाही इथे रमेश कुसाजी बोरकर यांच्या मालकी हक्काचा बैल घराच्या शेजारी असलेल्या कोठ्यात बांधलेला असताना रात्रौला वाघाने येऊन शिकार केली. या अगोदर सुद्धा असाच मोठा बैल वाघाने घरातून नेऊन शिकार केला होता. त्यामुळे लोणवाही परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भरवस्ती मध्ये आता वाघ शिरकाव करत असल्याने लोणवाही वासीय लोकांमध्ये धास्ती भरली असून आता शेतीचे कामे सुरु झाल्याने बरेच लोक आपल्या शेतीच्या कामाकरिता दिवसभर बाहेर असतात.आणि अश्यातच वाघाचे आक्रमण गावात होऊन शिकार सुरु राहल्यास एक दिवस मनुष्याची सुद्धा शिकार करायला मागे पुढे होणार नाही. त्यामुळे आताच वनविभागाने या कडे लक्ष्य देऊन त्या वाघाचा बंदोबस्त करावे अशी मागणी लोणवाही वाशीय लोकांकडून होत आहे.


