कपिल मेश्राम यांचे रक्तदानातून समाजकार्य
समाजकार्यात सतत अग्रेसर असलेल्या कपिल मेश्राम यांचे अनोखे छन्द
सिंदेवाही तालुक्यातील रत्नापुर येथील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले सुशिक्षित तरुण, नवराष्ट्र चे पत्रकार कपिल सदाशिव मेश्राम त्याने काळाची पाऊले ओळखत रक्तदान करून समाजासमोर एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे. सातत्याने कार्यक्रमाचे औचित्य साधून रक्तदान करीत आले आहे. आतापर्यंत त्यांनी ४१ वेळा रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जोपासत तरुणांना रक्तदानाचा मौलिक संदेश दिला.
मागील २० वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले कपिल मेश्राम हे समाजाला देणे म्हणून
विविध उपक्रमात भाग घेऊन रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जोपासत आले आहेत. वयाच्या १८ वर्षापासून ते रक्तदान करीत असून, आजपर्यंत रक्तदाता कपिल मेश्राम यांनी ४१
वेळा रक्तदान केले आहे. नुकताच सिंदेवाही पोलिस स्टेशन येथे रक्तदान शिबिर येथे ४१ वा रक्तदान करुण, मान मिळविला आहे. कुणी पेशंट दवाखाना मधे भरती असेल आणि त्या रुग्णाला
रक्तची गरज असेल तर लगेच रक्तदान करण्यासाठी ते तयार असतात. आजपर्यंत बरेच रुग्णना यांनी रक्तदान केला आहे. यांचा रक्तगट “ओ “पॉजिटिव असल्याने सर्वाना उपयोगी पड़ते. त्यांचे रक्तदानाचे कार्य पाहुन त्यांचे मित्रही रक्तदाना करायला लागले आहेत. रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान आहे हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
एखाद्याला जीवनदान देण्यापेक्षा मोठे दान नसून रक्तदानातून हे शक्य आहे. यामुळेच रक्तदानाला जीवनदान म्हटले जाते. यांच्या गौरवशाली कार्यामुळे सिंदेवाही तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
कोट..
जेव्हा पहिल्यांदा रक्तदान केलं तेव्हा मी १८ वर्षाचा होतो. पहिल्यांदा रक्तदान केले तेव्हा मला कसल्याच प्रकारची भीती वाटली नाही. मी वर्षातून तीन वेळा रक्तदान करतो,आतापर्यंत ४१ वेळा रक्तदान केलेले आहे. आपण सर्वांनी रक्तदान करणं गरजेचं आहे. रक्तदान केलं तर आपण अनेक आजारांपासून दूर राहतो. आपल्याला धोकादायक आजार होत नाहीत. आपल्या वेळोवेळी तपासण्या होत राहतात. तसेच रक्तदान केल्याने कुणाचा तरी जीव वाचतो. यामुळे आपण सर्वांनी रक्तदान करावे….
;-कपिल सदाशिव मेश्राम
रक्तदाता


