नगरपंचायत व संबंधित प्रशासनाचे कानाडोळे
सिंदेवाहीत विकासाला गती केव्हा प्राप्त होणार
पहिल्याच पावसात सगळीकडे चिखलाचे सामाज्य
श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही :- सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या सिंदेवाही-टेकरी मार्गावर दर सोमवारी आठवडी बाजार भरतो. सदर बाजारच्या रस्त्यावर व बाजारात पावसामुळे चिखलाचे साम्राज्य दिसून येत असल्याने नागरिकांना आठवडी बाजारात येताना खूप मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. याकडे नगरपंचायत व संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सिंदेवाही शहराला लागून टेकरी, वाकल, लोनवाही, गडमौशी, किन्ही, मुरमाडी, यासारखे गावे असल्याने येथील नागरिक सिंदेवाही शहरात दर सोमवारी भरत असलेल्या आठवडी बाजारात मोठ्या संख्येने येत असतात. परंतु वास्तवात बाजारात चिखलाचे साम्राज्य पसरले असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सिंदेवाही शहरात यापूर्वी शहरातील गुजरी चौकात दर सोमवारी आठवडी बाजार भरत होता. त्यात नागरिकांची अत्यंत गर्दी होत असल्याने नगरपंचायत प्रशासनाने नागरिकांच्या सोयीसाठी सिंदेवाही- टेकरी मार्गावर असलेल्या नगरपंचायत हद्दीत असलेल्या जागेवर आठवडी बाजार भरविण्याचा निर्णय घेतला. परंतु सदर बाजारात माती असल्याने सुरू असलेल्या पावसाळ्यात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निदर्शनास येत असल्याने नागरिकांना अत्यंत नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बाजारात व बाजार रस्त्यावर सर्वत्र चिखल पसरले असल्याने चालताना घसरून पडणे किवा मोटासायकल स्लीप होऊन अपघात होण्याची दाट शक्यता नागरिकांत वर्तविली जात आहे. कोट :- सिंदेवांही – लोनवाही नगरपंचायत अंतर्गत भरत असलेल्या आठवडी बाजारात व बाजार रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असल्याने बाजारात येताना आम्हा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन त्यावर निराकरण करणे गरजेचे आहे. नितिन निकुरे (नागरिक)


