करोडो रूपे खर्च करून नाली बनवले मात्र नियोजनाच्या अभावामुळे पानी वाहण्याच्या समश्या
दुकानासमोर पानी जाण्याकरिता खोदल्या गेल्या jcb लावून नाल्या सारखे खड्डे.
श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही मध्ये अनेक महिन्यापासून हायवे रस्ताच्या दोन्ही बाजूच्या नाल्याचे काम सूरु आहे. मात्र नाली बनवायला लाखो करोडो रूपे खर्च करून सुद्धा रस्त्या वरचे पाणी जाण्यास अडचण निर्माण होत असल्याने आणखी त्याच नाल्याच्या बाजूला jcb ने नाल्या सारखे खोल खडे बनवून पानी काढण्यात येत असल्यामुळे प्रशाशनावरती प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
या अगोदर अनेक दुकाने नालीचे बांधकाम सुरु असल्या कारणाने बंद ठेवले होते . त्यामुळे अनेक दुकानदारांना आपलें उदर्निवाह करण्यास अडचण निर्माण झालेली होती. मात्र आता नाल्याचे बांधकाम झाल्या नंतर कसे बसे आपलें दुकाने सुरु करून प्रपंच चालवत असताना मधेच बांधकाम विभागाने (bjp ऑफिस समोर चा रस्ता वरती पानी जमा होत असल्याने शाळकरी विध्यार्थी तथा येणारे जाण्याऱ्या प्रवासावरती चिखलाचे पानी उडत असल्याने त्या रस्त्याच्या बाजूला jcb लावून नाली सारखे खोल भाग केल्याने दुकानदार लोकांना आपलें वेवसाय करणे अडचणीचे झाले आहे.
बांधकाम विभागाने याकडे त्वरित लक्ष्य देऊन त्यांच्या ये जा करण्याऱ्या रोडची समश्या दूर करावे अशी मागणी तिथल्या दुकानदार लोकांकडून होत आहे.
(बांधकाम विभागाचे इंजिनियर यांना विचारणा केले असता त्यांनी म्हटले कि रोडावरती पानी साचत असल्याने आम्हला ते नाल्या सारखे खोदावे लागले.)


