अनेक चारचाकी वाहनाचे चेंबर फुटले
पाईप लाईन टाकणाऱ्या अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणा
पाऊस सुरु असल्याने त्या ठिकाणी खड्डे भरून राहतो त्यामुळे रस्त्यातील खड्डे लक्ष्यात येत नाही
श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो. नं. 9864271316
सिंदेवाही ते नवरगाव महामार्गावरती मिनघरी फाट्याजवळ तसेच अंतरंगाव आणि नवरगाव च्या मध्ये असे दोन ठिकाणी पाईप लाईन वाल्यानी खूप मोठे मोठे नाली खोदून त्या ठिकाणी पाईप लाईन रोडवरून केलेली आहे. मात्र त्या पाईप लाईन टाकल्यानंतर त्या रोडावरती कोणत्याही प्रकारची माती किंवा डबल कॉंक्रेन्ट केलेला नाही त्यामुळे रस्त्यावरून येजा करण्याऱ्या लोकांना आपलें जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने प्रशाशनाबद्दल चीड निर्माण होत आहे.
यावरती त्वरित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी या रोडची पाहणी करून जे कोणी हे पाईप लाईन त्या ठिकाणी टाकलेले असतील त्यांच्या वरती सिंदेवाही पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करून उचित कारवाही करावे अशी मागणी सामाजिक युवा ब्रिगेड संघठनेचे अध्यक्ष्य श्री अमोल निनावे यांनी केली आहे.
जर कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही तर उपोषणाला त्याच ठिकाणी बसून ज्या वेक्तीचे अपघात होतील किंवा त्यांच्या वाहन क्षतिग्रस्त होतील त्यांची नुकशान भरपाई हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी देतील. त्यामुळे त्वरित याकडे लक्ष्य देऊन ते खड्डे बुजविणाच्या करावे अशी मागणी संघटनाच्या तसेच नवरगाव, अंतरंगाव, मिनघरी वाशीय जनतेकडून होत आहे.


