बँक ऑफ इंडियाचे बँक मित्र म्हणून काम करणारे शशिकांत लेंझे आणि मातृभूषण मोटघरे हे ठरत आहेत महत्व्हाचे दुवा..
श्री अमोल निनावे
संपाद्क:झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
मागील अनेक वर्षांपासून केंद्र शासनाने सर्वच राष्ट्रीयकृत बँकांच्या मार्फतीने प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजनेची सुरवात केली.या विम्याला सद्यस्थितीत 436 ₹ या वार्षिक देय एकदाच प्रमाणे सौ. मंदा खेमचंद चौके मु.नांदगाव ता. सिंदेवाही जी. चंद्रपूर यांनी हा विमा बँक ऑफ इंडिया नवरगाव मधून काढलेला होता .परंतु नुकताच त्याचा 1 जून 2025 ला. आजारपणातून मृत्यू झाला असल्याने .घरच्यांनी बँकेत विचारपूस केली असता.बँक मित्र शशिकांत लेंझे व मातृभुषण मोटघरे यांच्या पुढाकाराने .त्यांचे वारसदार म्हणून जयंता खेमचंद चौके ( मुलगा ) यांना 2 लाख रुपयांचा धनादेश . मा.शाखा प्रबंधक प्रकाश पांडा सर व अधिकारी आशिष रामटेके सर यांच्या हस्ते वितरित करण्यात आला .महत्वाचे म्हणजे मागील 5 वर्षात 30 हून अधिक लाभार्थ्यांना या विमा योजनेचा लाभ मिळवून देण्याचे कार्य बँक मित्रांच्या मदतीने नवरगाव शाखेने केलेले आहे.
तसेच आजच्या दिवशीच शाखेत किसान दिवस व बँक राष्ट्रीयकृत दिवस साजरा करण्यात आला व नियमित कृषी कर्ज परतफेड करणाऱ्या 25 शेतकऱ्यांना नव्याने कर्ज वितरण तसेच परिसरातील महिला स्वयं.सहा.समूह ( बचत गट) जे बँक ऑफ इंडिया नवरगाव शाखेला जोडले आहेत अशा नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या 20 समूहांना आजच्या दिवशी कर्ज वितरीत करण्यात आले.या प्रसंगी मा.प्रबंधक साहेबांनी विविध बँकेच्या योजना, व शेतकऱ्यांना यांत्रिक शेतीसाठी बँकेकडून पुरविण्यात येणाऱ्या सोई सुविधा व सिंचनाच्या योजना यावर प्रकाश टाकला. तर अधिकारी रामटेके सर यांनी बचत गटांना विविध गृहउद्योग, व शेतीसोबतच परस्पर पूरक उद्योग व नियमित कर्ज परतफेड याचे फायदे सांगितले.तर बँक मित्र व बँक सखी यांनी विमा योजनेची व RD/ FD खाते व पेन्शन योजने विषयी माहिती सांगितली.


