श्री अमोल निनावे
संपाद्क;-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
लाडबोरी :: मौजा लाडबोरी मध्ये ‘शाळा माझी हिरवीगार’ ही संकल्पना राबविण्यात आली. शाळेला हिरवगार करण्यासाठी मागील वर्षीला वृक्ष देणारा प्रथम दाता ठरले ते म्हणजे त. पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण साहेब पो.स्टे. सिंदेवाही.आणि आज त्यांच्या नावाचे वृक्ष शाळेत डौलत आहे. वृक्षवल्ली आपले सगेसोयरे आहेत, हाच विचार मनाशी बाळगून या वर्षीला मा. कांचन पांडे साहेब, पोलीस निरीक्षक पो.स्टे. सिंदेवाही, मा.कोकिळा विवेक मोहुर्ले आणि मा. स्वप्नील कावळे माजी नगराध्यक्ष, सिंदेवाही यांनी सुद्धा शाळेला वृक्ष भेट दिलीत.
त्यामुळे आज दिनांक १७ जुलै २०२५ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथ. शाळेच्या पटांगणात वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित केला, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. कांचन पांडे साहेब, प्रमुख अतिथी मा.अंजली बोरावार, वन परिक्षेत्र अधिकारी प्रादे सिंदेवाही, मा.एकता नागदेवते माजी विद्यार्थिनी तथा सहा,गट विकास अधिकारी) , मा.मुन साहेब, (ग्राम विकास अधिकारी, ग्राम पंचायत लाडबोरी ,) मा.ममता चहांदे, सरपंच ,मा.अंबादास चौके, मा.प्रशांत मदनकर(शा. व्य. स.)मुख्याध्यापक मा.मांदाळे सर ,मंचावर उपस्थित होते. वृक्षाची जोपासना करण्या बाबत आणि वाढणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्याचे मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
मागील वर्षी आणि या वर्षी लावलेल्या वृक्षाचे संगोपन व संवर्धन करण्याबाबतचे वचन विद्यार्थ्या कडून पाहुण्यांनी घेतले, या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजश्री वसाके शिक्षिका यांनी केले,तर प्रास्ताविक मुख्याध्यापक मांदाळे सर, व आभार प्रदर्शन वनिता ठाकरे शिक्षिका यांनी मानले. हा सोहळा घेण्यासाठी अथक मेहनत घेणारे मा. सुनील गेडाम (शा. व्य. स. सदस्य, लाडबोरी ),गुरनुले सर , राहंगडाले सर यांनी वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साठी मोलाचे प्रयत्न केले .


