श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही:-जनसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने निसर्गचक्र बरोबर चालावे या उदार्थ हेतूने व अवैध वृक्षतोडीमुळे झालेल्या निसर्गाचा र्हास त्यामुळे ऋतुमान बदल उष्णता या गंभीर परिणामा मुळे लोक हिताचा उदारता हेतू ठेवून धरणी मातेचा निसर्गसमतोल राखण्यासाठी दिनांक 18/7/ 2025 ला वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला सर्वप्रथम सुरुवात पोलीस स्टेशन सिंदेवाही येथून करण्यात आली तदनंतर तहसील कार्यालय सिंदेवाही व पंचायत समिती सिंदेवाही या सर्व कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला प्रत्येक कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांनी सहकार्य केले वन विभागाचे अधिकारी श्री गळपाहिले साहेब यांनी वसुंधरेचे महत्त्व समजावून दिले वृक्षतोडाला आळा घालून वृक्ष संवर्धन कसे करावे याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला पोलीस स्टेशन शिंदेवाडी चे पोलीस निरीक्षक श्री कांचन पांडे साहेब व शिंदे पोलीस स्टेशन येथील समस्त कर्मचारी वृंद शिंदेवाडी तहसीलचे तहसीलदार संदीप जी पानमन साहेब व तहसील कार्यातील कर्मचारी वृंद पंचायत समिती गटविकास अधिकारी आत्मज मोरे साहेब पंचायत समिती कर्मचारी वृंद यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमाप्रसंगीविश्व हिंदू परिषद नगर अध्यक्ष मंगेश पुट्टावार,बजरंग दल सिंदेवाही प्रखंड पालक राहुल कावळे,बजरंग दल प्रखंड संयोजक कुणाल पेशंट्टीवार, बजरंग दल नगर संयोजक प्रमोद नन्नावरे, बजरंग दल वाल्मिकी चौक संयोजक साहिल मेश्राम, , गुरुदेव चौक संयोजक रोशन करकाडे, कोहळी मोहल्ला संयोजक विनोद बोरकर, सहसंयोजक किशोर बोरकर व इतर विश्व हिंदू परिषद बजरंग दल कार्यकर्त योगेश लोखंडे, छगन लोखंडे, लखन लोखंडे, नितीन बावणे, नयत मोहर्ले, शुभम कुचनवार. उपस्तिथ होते.


